Vidhan Sabha 2019 : पुण्यात भाजपची स्वबळावर लढण्याचीही चाचपणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेल्या निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनेदेखील चाचपणी केली.

विधानसभा 2019 
पुणे-  विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेल्या निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनेदेखील चाचपणी केली. शिवसेना बरोबर नसेल, तर काय होऊ शकते, कोणत्या मतदारसंघात त्याचा किती फटका बसू शकतो, याचा आढावा आमदारांसोबतच शहर पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी घेतला. 

मुलाखतीपूर्वी महापौर बंगल्यात पक्षाचे आठही आमदार आणि शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांनी शिवसेना आपल्या बरोबर नसेल, तर त्याचा कोणत्या मतदारसंघात काय परिणाम होऊ शकतो, याबाबत आमदारांची मते जाणून घेतली.

शहरातील आठपैकी चार मतदारसंघ मिळावेत, अशी अपेक्षा शिवसेनेची आहे. युती नसेल तर शिवाजीनगर, हडपसर आणि पुणे कॅंटोन्मेंटमध्ये किती फटका बसू शकतो, अशी विचारणा शेलार यांनी केली. त्यावर आमदारांनी आपली बाजू मांडली. त्यांच्या सर्व नोंदी शेलार यांनी या वेळी घेतल्या. त्यानंतर प्रत्येक आमदाराला स्वतंत्रपणे भेटून शेलार यांनी मते जाणून घेतली. या बैठकीमुळे शिवसेना-भाजप युती होणार की नाही, याबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांची यादी
कसबा मतदारसंघ - मुक्ता टिळक, गणेश बिडकर, धीरज घाटे, महेश लडकत, दिलीप काळोखे, अशोक येनपुरे, स्वरदा बापट, हेमंत रासने, मनीष साळुंके
 

कॅंटोन्मेंट मतदारसंघ - दिलीप कांबळे, अतुल गायकवाड, संजय पवार, सुखदेव अडागळे, प्रकाश सोनवणे, किरण कांबळे, बाप्पू कांबळे, अतुल गायकवाड, प्रवीण गाडे, वर्षा गाडे, वीरसेन जगताप, विष्णू हरिहर, पांडुरंग शेलार, सुनील माने, मिलिंद अहिरे
 

हडपसर मतदारसंघ - योगेश टिळेकर, विकास रासकर, जीवन जाधव, अनुपसिन्हा गौड, बाबासाहेब शिंगोटे, मारुती तुपे, ज्ञानेश्‍वर कुडले, मेघना पुराणिक, उमेश गायकवाड
 

पर्वती मतदारसंघ - माधुरी मिसाळ, श्रीनाथ भिमाले, गोपाळ चिंतल, राजेंद्र शिळीमकर

खडकवासला मतदारसंघ - डॉ. राजेंद्र खेडकर, प्रसन्न जगताप, संजितादेवी राजेनिंबाळकर, राजू लायगुडे, हेमंत दांगट, दिलीप वेडे-पाटील, राजाभाऊ जोरी, अभिजित देशमुख, भीमराव तापकीर, दीपक माने, सुनील मारणे, अरुण राजवाडे

कोथरूड मतदारसंघ - राजेश बराटे, विशाल गांधिले, संदीप खर्डेकर, श्‍यामराव सातपुते, मंजूश्री खर्डेकर, सुशील मेंगडे, नीलेश निढाळकर, योगेश राजापूरकर, मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ, राहुल कोकाटे, अमोल बालवडकर

शिवाजीनगर विधानसभा - विजय काळे, राजेंद्र खेडकर, रवींद्र साळेगावकर, विजय शेवाळे, अजय दुधाने, उषा बाजपेयी, महेंद्र कदम, अशोक मुंडे, नितीन कुंवर, अनिल भिसे, नंदकुमार मंडोरा, अनिल पवार, सुनील माने, बाळासाहेब आमराळे, अपर्णा गोसावी, दत्तात्रय खाडे, संतोष लांडगे, नीलिमा खाडे, सुधीर आल्हाट, श्‍यामराव सातपुते, सतीश बहिरट, अर्चना मुसळे, मधुकर मुसळे, गणेश गायकवाड, ज्योत्स्ना एकबोटे, शिरीष नायकरे, शंतनू खिलारे-पाटील, सिद्धार्थ शिरोळे,  सुधीर मांडके, संजय सावळे, लहुदास कुलकर्णी

वडगाव शेरी मतदारसंघ - जगदीश मुळीक, राजेश लोकरे, महेंद्र गलांडे, उषा बाजपेयी, संजय पवार

आठही जागांसाठी तयारी 
मुलाखती नंतर पत्रकारांशी बोलताना शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘‘शांततेत आणि सुरळीतपणे मुलाखती पार पडल्या. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आठही जागा लढविण्याची तयारी पक्षाने केली आहे. शिवसेनेबरोबर युती करण्यासंदर्भातील निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.’’

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP is fight on its own in Pune