भाजप इच्छुकांच्या आजपासून मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

पुणे - महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवारपासून घेण्यात येणार आहेत. जंगली महाराज रस्त्यावरील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात येत्या बुधवारपर्यंत (ता. 11) रोज मुलाखतींचा कार्यक्रम सुरू राहील. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रभाग क्रमांक 1 ते 10 मधील इच्छुकांच्या मुलाखती होतील.

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, पक्षाचे अध्यक्ष योगेश गोगावले, संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्यासह पक्षाचे आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाखती होतील. रोज दहा प्रभागांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सोमवारी (ता. 9) प्रभाग क्रमांक 11 ते 20, मंगळवारी (ता. 10) 21 ते 30 आणि बुधवारी (ता. 11) 31 ते 41 या प्रभागांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येतील. सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते रात्री आठ अशा दोन टप्प्यांत मुलाखती होतील, अशी माहिती पक्षाचे कार्यालयमंत्री उदय जोशी यांनी कळविली आहे. आतापर्यंत पक्षाकडून सुमारे 1100 इच्छुकांनी अर्ज नेले असून, त्यापैकी 870 जणांनी अर्ज जमा केले आहेत. त्यात 490 पुरुष आणि 380 महिला इच्छुक आहेत. दरम्यान, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी इच्छुकांनी मुलाखतीसाठी येताना एकापेक्षा अधिक कार्यकर्त्यांना आणू नये, असे सांगत पक्षाने इच्छुकांना शक्तिप्रदर्शन न करण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: bjp interested candidate interview