esakal | मला मिळालं नाही, पण नाथाभाऊंना तरी तिकीट द्यायला पाहिजे होतं!
sakal

बोलून बातमी शोधा

Khadse-Kakade

आमदार अनिल भोसले यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हेतूतः कारवाई झाली आहे, असे वाटत नाही.

मला मिळालं नाही, पण नाथाभाऊंना तरी तिकीट द्यायला पाहिजे होतं!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''दिल्लीत जाण्यात मला स्वारस्य नव्हतेच, राज्यात काम करण्यात मला 'इंटरेस्ट' असल्याचे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे. त्यामुळे ते मला राज्यातच अल्पावधीत चांगली संधी देतील,'' असे प्रतिपादन भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी (ता.१२) पत्रकार परिषदेत केले.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी द्यायला हवी होती, असेही मत त्यांनी व्यक्त केले. काकडे यांच्या खासदारकीची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. भाजपने राज्यातून रामदास आठवले, उदयनराजे भोसले आणि डॉ. भगवत कराड यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

- मोठी बातमी - मुनगंटीवार म्हणतात "आम्ही फसवलं, पण याचा फायदा कुणी उचलू नका"

या पार्श्‍वभूमीवर काकडे म्हणाले, ''दिल्लीत काम करण्यापेक्षा राज्यात काम करण्यास मला आवडते. याची कल्पना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यांनीही राज्यात लवकरच चांगली संधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे.'' खासदारकीची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. त्यानंतर लगेचच राज्यातील समर्थकांसह मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

- उमेदवारीची अपेक्षा नव्हतीच आणि तसेच झाले : खडसे 

खडसे यांचे ज्येष्ठत्त्व लक्षात घेता त्यांना राज्यसभेची उमेदवारी द्यायला हवी होती, याचाही त्यांनी पुनरूच्चार केला. राज्यसभेसाठी उमेदवारी दिली नाही म्हणून मी नाराज नाही. या बाबत पक्षाशी सविस्तर चर्चा झाली आहे. आमदार अनिल भोसले यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हेतूतः कारवाई झाली आहे, असे वाटत नाही. कायद्यावर आमचा विश्‍वास आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

loading image