Vidhan Sabah 2019 : कोथरूडचं लीड दीडलाखाच्या पुढे मोजायचं : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

संघर्षाशिवाय मजा नाही. कोथरूडमध्ये (सुरवातीच्या घडामोडी) काही घडलं नसतं तर निवडणुकीत काही दमच उरला नसता. राज्यातील आज सकाळचा रिपोर्ट उत्साहवर्धक असून, 250 चा आकडा आम्ही गाठू शकतो. शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण मतदानात त्याचा काही परिणाम होणार नाही.

पुणे : कोथरुडचा कल भाजपकडे जाणवत आहे. त्यामुळे कोथरूडचं यंदाचं लीड 1 लाख 60 हजारांच्या पुढे मोजयचं, असे कोथरुड विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातून लढत असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचे आव्हान आहे. कोल्हापूरातून येऊन कोथरूडमध्ये लढत असल्याने याठिकाणी निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आज (सोमवार) चंद्रकांत पाटील म्हणाले, की संघर्षाशिवाय मजा नाही. कोथरूडमध्ये (सुरवातीच्या घडामोडी) काही घडलं नसतं तर निवडणुकीत काही दमच उरला नसता. राज्यातील आज सकाळचा रिपोर्ट उत्साहवर्धक असून, 250 चा आकडा आम्ही गाठू शकतो. शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण मतदानात त्याचा काही परिणाम होणार नाही. शरद पवारांनी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी खेळ्या केल्या, पण त्याचा परिणाम होण्याइतके लोक आता मूर्ख राहिलेले नाहीत. शरद पवार पॅनिकिझम मोडमध्ये, त्यावेळी वेगवेगळी वक्तव्ये, पॅनिकिझम माणसाला ऱ्हासाकडे नेतो, तीच अवस्था आघाडीची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Chandrakant Patil contest election in Kothrud for Maharashtra Vidhan Sabha 2019