Vidhan Sabha 2019 : 'त्यांना साधा एक उमेदवार मिळाला नाही' : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

370 कलमावर मत मागत आहोत म्हणून आमच्यावर टीका होत आहे, वाद होत आहे.

पुणे : ''कोथरूडमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत, पण विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साधा एक उमेदवार मिळाला नाही. आणि ज्या मनसेला पाठिंबा दिला आहे, ते आघाडीतच नाहीत,'' अशी टीका पालकमंत्री आणि कोथरूडचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केली. 

कोथरूड येथे लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांचे 
'कलम 370, 35-अ आणि लडाख' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. 
पाटील म्हणाले, मला पुण्याचे प्रश्न माहिती आहेत. 17 टीएमसी पाणी मिळाले पाहिजे, महावितरणची व्यवस्था योग्य नाही. त्याचेही काम केले पाहिजे. सहा आणि नऊ मीटर रस्त्याचा प्रश्न आहे. नदीपात्रातील रस्ता रखडलेला आहे. त्याचा अभ्यास सुरू आहे. माझ्यावर धडाधड जबाबदारी पडत आहे. त्याचा उपयोग पुण्याच्या विकासासाठी होत होईल. 

370 कलमावर मत मागत आहोत म्हणून आमच्यावर टीका होत आहे, वाद होत आहे. मात्र, या विषयावर 40 मिनिटांच्या भाषणात 3 मिनिटं बोलतो, कारण हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. महाआघाडीला उमेदवार मिळाला नाही. जो आघाडीत नाही त्या मनसेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोणत्याही वादात न पडता कोथरूडच्या विकासासाठी भाजपला मत द्या.

कोथरूड विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने कोथरूडमधील भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. पाटील यांच्या विरोधात मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. स्वत: राज ठाकरे शिंदे यांच्या प्रचारासाठी पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने कोथरूड मतदारसंघासाठी मनसेला पाठिंबा दिल्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- मंदीतही मर्सिडीजचा धंदा तेजीत...

- Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांनी फसवल्याची राणेंकडून कबुली

- Vidhan Sabha 2019 : राहुल गांधींचा 'करिष्मा' विधानसभेत दिसणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Chandrakant Patil criticized opposition parties