संजय राऊत - देवेंद्र फडणवीस गळाभेट; भाजपच्या नेत्याचा खुलासा

BJP leader Chandrakant Patil Speaks About Sanjay Raut  and Devendra Fadnavis hug
BJP leader Chandrakant Patil Speaks About Sanjay Raut and Devendra Fadnavis hug

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पडला. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी गळाभेट घेतली होती. यावरुन राजकीय वर्तुळात या गळाभेटीची चर्चा सुरु होती. दरम्यान, याबाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,''फडणवीस यांनी संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवं होतं. स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यावर राजकीय विषय वेगळे असले तरी एकमेकांची आपण गळा भेट घेतो. राजकारणात मैत्री असायलाच हवी, जरी आम्ही पवार साहेबांवर टीका टिपण्णी केली तरी आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात काम वाढवायचं असेल तर त्यांच्यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही. पवार साहेब भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणारच ही आमची संस्कृती आहे.'' 

''दुश्मन जरी असला तरी तो त्या जागी एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो'' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी  देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या गळाभेटीवर दिली.

आणखी वाचा - जेव्हा अजित पवार, खाली वाकून कामाचा दर्जा तपासतात

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना पाटील म्हणाले, ''शेतकऱ्यांना या बजेटमधून भरीव तरतुद केली जाईल. मध्यमवर्गीयांनाही या बजेटमधून दिलासा मिळणार आहे. टॅक्स स्लॅब, गृहकर्जबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण करणार हे बजेट असेल.''
 
पुण्यात 30 जानेवारीला एल्गार परिषद झाली. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ''भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एफआयआर दाखल करेल, परंतु वर्षानुवर्षे हिंदू समाजाला दोष देऊन सुद्धा हिंदू समाज एकसंघ आहे. याचं मोठं उदाहरण रामजन्मभूमी आहे. मूठभर लोक कितीही असले तरी त्याचा हिंदू समाजाच्या मनावर कुठलाही परिणाम होणार नाही. हिंदू ही एक कार्यपद्धती आहे. जीवन जगण्याची पद्धती आहे, त्या नियमांना सगळं जग एक्सेप्ट करत आहे.''

आणखी वाचा - पुण्याचं विमानतळ होणार क्वारंटाईन

नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या केंद्रीय कृषी कायद्यांबाबत घेतलेल्या भूमिकेबाबात बोलताना, पाटील म्हणाले,'' केंद्र सरकारने या पलीकडे  काय करावं हे मलाही कळत नाही. जर दीड वर्ष कायद्याची अंमलबजावणी थांबणार आहे त्या काळात चर्चा होऊ शकते, विश्वासात घेतलं जाऊ शकतो ! हा आडमुठेपणा सुरू आहे. ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभामध्ये हे कायदे संमत झाले, त्यावेळेस पवार साहेब दिल्लीमध्ये नव्हते. कायद्यांवर चर्चा झाली पाहिजे असं वाटत होतं, तर ज्या दिवशी कायदा संमत झाला त्यादिवशी त्याला विरोध करण्यासाठी का होईना, पण सभागृहात असायला हवं होतं. शिवसेनेने तर लोकसभेमध्ये पाठिंबा दिला. राज्यसभेत बहिष्कार टाकला. निवडणुकीत विजयी न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या सरकारला त्रास देण्याचे काम सुरु आहे. पवार साहेबांना दीड वर्ष चर्चा करण्याची संधी आहे.''
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com