मंत्र्यांनी पोरकटपणा बंद करावा...भाजप नेत्याची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर जोरदार टीका  

डाॅ. संदेश शहा
Tuesday, 28 July 2020

राज्यमंत्र्यांनी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी कोरोना संकटकाळात स्टंटबाजी करून जनतेच्या जिवाशी खेळू नये, अशी टीका भाजपचे नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यात कोरोनाचे संकट गंभीर बनले असून, संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रभावी उपाययोजना होणे गरजेचे असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे कुठलेही शासकीय निकष न पाळता गर्दीत सूरपाट्या खेळण्याचा आणि स्वछायाचित्र असलेले पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. राज्यमंत्र्यांनी आपली निष्क्रियता झाकण्यासाठी कोरोना संकटकाळात स्टंटबाजी करून जनतेच्या जिवाशी खेळू नये, अशी टीका भाजपचे नेते तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
 

थरार...बिबट्याच्या मागे काठी घेऊनच धावला मेंढपाळ, पण...

इंदापूर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दररोज वाढत असून रुग्ण संख्या सुमारे झाली आहे. मात्र, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भरणे यांच्याकडून शासकीय पातळीवर प्रभावी उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. इंदापूर कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटरसह विविध सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तालुक्यात भिगवण व इतर ठिकाणी कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. कोरोना नागरिक ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंटकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यात युवकांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असताना त्यांच्या बरोबर सूरफाट्या किंवा पतंग उडवण्याऐवजी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम राज्यमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून ते अपयशी ठरले आहेत, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. 

आळंदीत सुरू आहे धक्कादायक प्रकार, दिसली जागा की टाकला... 

मंत्री पदावरील व्यक्तीने बेजबाबदारपणे न वागता कर्तव्याची जाणीव ठेवून जबाबदारीने वागणे आवश्यक असते, मात्र, जबाबदार पदावरील व्यक्तीने कोरोनाच्या संकट काळात सूरफाट्या खेळून व पतंग उडवत पोरकटपणे वागणे, हे  तालुक्याच्या संस्कृतीला धरून नाही. त्यामुळे कोरोनाची भीती घालवण्यासाठी राज्यमंत्र्यांनी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. 
 - हर्षवर्धन पाटील, भाजप नेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Harshvardhan Patil criticizes Minister Dattatreya Bharane