‘महाजनादेश’साठी शक्तिप्रदर्शन

BJP
BJP

पुणे - महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर वातावरणनिर्मिती करण्याचा निर्धार भाजपच्या महाबैठकीत रविवारी करण्यात आला. यात्रेदरम्यान गर्दी जमविण्याची जबाबदारी सर्व नगरसेवक, आमदार आणि प्रमुख कार्यकर्त्यांवर टाकली आहे. यात्रेदरम्यान कोण किती सक्रिय होते, याचा लेखाजोखा पक्ष ठेवणार असल्याचेही सांगण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १४ सप्टेंबर रोजी शहरात येत आहे. त्यानिमित्ताने तयारीसाठी शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची महाबैठक झाली. पक्षाची कार्यकारिणी, सर्व नगरसेवक, आमदार, शक्तीप्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते आदी सुमारे ७०० जण बैठकीस उपस्थित होते. या वेळी शहरात यात्रेनिमित्त पक्षाची वातावरणनिर्मिती करण्याचे ठरले. त्यासाठी ठिकठिकाणी स्वागत करणे, पक्षाचे झेंडे लावणे, कार्यकर्त्यांमार्फत तसेच शक्तीप्रमुखांमार्फत नागरिकांपर्यंत पोचण्याचे नियोजन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेचे नियोजन असल्यामुळे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी शत-प्रतिशत उपस्थित होते. यात्रेसाठीच्या जबाबदाऱ्यांचेही नियोजन झाले. 

बारामतीमध्ये कार्यक्रम असल्यामुळे खासदार गिरीश बापट उपस्थित नव्हते. यात्रेच्या पुढे भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते दुचाकी रॅलीने सहभागी होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही यात्रा होत असल्यामुळे संपूर्ण ताकद लावून वातावरणनिर्मिती करायची असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात भाजपची ताकद मोठी आहे. ही ताकद या वेळी दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी जोर लावला पाहिजे.
- माधुरी मिसाळ, शहराध्यक्षा, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com