

Ravindra Chavan
ESakal
पुणे : विकसित महाराष्ट्राचे स्वप्न आपण पाहत आहोत. यात प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. पण आपली भूमिका विरोधकांना पटणार नाही, ते विरोधाच्याच चष्म्यातून बघणार आहेत. त्यांचा जन्म टिआरपीची लढाई जिंकण्यासाठी झाला आहे. तर भाजप कार्यकर्त्यांचा जन्म हा हिंदुत्वासाठी झाला आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांवर टीका केली.