Chandrashekhar Bawankule : मन की बात ऐका, नाही तर पद सोडा

चंद्रशेखर बावनकुळे यांचा भोर, पुरंदर, खडकवासला मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना इशारा
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal

धायरी - अमेठी नंतर आता आपल्याला बारामती जिंकायची आहे. असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज धायरी येथील 'महाविजय-२०२४' या पदाधिकाऱ्यांच्या सवांद मेळाव्यात सांगितले. परंतु याच लोकसभा मतदार संघातील भोर तालुक्यात मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी अवघे १५ जण उपस्थित असल्याची खंत व्यक्त करावी लागली.

बारामती लोकसभा प्रवासा दरम्यान पुरंदर, भोर व खडकवासला या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्या मेळाव्याला संबोधित केले. सगळ्यात मोठी प्रतिष्ठा आहे. मला अमेठी नंतर बारामती जिंकायची, याच सगळ्यात मोठं श्रेय तुमच असेल, त्यासाठी तुम्ही कामाला लागा. असे बावनकुळे यांनी मेळाव्यात सांगितले. अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ते असे बोलल्याने बारामतीत कोण लढणार याचे गुड त्यांनी वाढवले.

मन की बात ऐकण्यासाठी येणार नाहीत. त्यांना पदावरून हटवणार आहे. भोरमध्ये अवघे १५ जण मन की बात ऐकण्यासाठी होते. मन की बात ऐकण्यासाठी आलाच पाहिजे. आणि त्याचे फोटो अपलोड झालेच पाहिजे. भोरच्या पदाधिकाऱ्यासाठी डिसेंबर महिना शेवटचा अल्टिमेटेम असेल असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

कार्यकर्ता हा कुठल्याही संघटनेचा प्राण असतो. भारतीय जनता पक्ष तर कार्यकर्त्यांनीच मोठा केलेला पक्ष आहे. केवळ भाजपातच कुठल्याही कौटुंबिक पार्श्वभूमी शिवाय सामान्य कार्यकर्ता आपल्या असामान्य कर्तुत्वाच्या जोरावर सर्वोच्च पदावर जाऊ शकतो. याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मूर्तिमंत उदाहरण आहे.

मोदीनी संकल्पित केलेला भारत घडवायचा असेल, तर 'महाविजय 2024' चा आपला संकल्प सत्यात उतरवण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यासाठी आगामी काळात कार्यकर्त्यांनी मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अविरत मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास संयोजक संजय ऊर्फ बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, शहराध्यक्ष धीरज घाटे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, मकरंद देशपांडे, सुनिल कर्जतकर, योगेश टिळेकर, वर्षा तापकीर, सचिन मोरे, गणेश वर्पे, नवनाथ तागुंदे, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, राजश्री नवले, अश्विनी पोकळे, राणी भोसले दत्तात्रय कोल्हे यांच्यासह खडकवासला पुरंदर, भोर येथील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com