मेधा कुलकर्णींच्या घरासमोर निदर्शने 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

कोथरूड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यास कुलकर्णी न आल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अलंकार पोलिसांनी साठ आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले. दरम्यान, कुलकर्णी यांचा मुलगा व काही आंदोलकांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यातील आमदार, खासदारांच्या घरांसमोर निदर्शने करण्यात येत आहेत. त्यानुसार आमदार कुलकर्णी यांच्या डाहणूकर कॉलनीतील निवास स्थानासमोर साठहून अधिक आंदोलकांनी निदर्शने केली. आंदोलकांनी कुलकर्णी यांनी स्वतः निवेदन स्वीकारण्याचा आग्रह धरला. मात्र, एक- दीड तासानंतरही त्या निवेदन घेण्यासाठी आल्या नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 

दरम्यान, एका आंदोलकाने त्यांच्या घराच्या दिशेने पाण्याची बाटली फेकली, त्यामुळे कुलकर्णी यांच्या मुलाने गॅलरीमध्ये येऊन आंदोलकांना जाब विचारला. आगोदरच निवेदन स्वीकारण्यासाठी कुलकर्णी आल्या नाहीत, तसेच त्यांनी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली नाही आणि त्यांच्या मुलाबरोबर वाद झाल्याने आंदोलकांच्या संतापात भर पडली. यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्याने 

काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी आंदोलकांनी रस्त्यावर बसून स्वतःचे मुंडण करून घेतले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. 

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या विरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक गेल्या वर्षी मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्चात मी सहभागी झाले होते. आज आंदोलकांकडून निवेदन स्वीकारण्याची माझी तयारी होती. माझ्या कार्यालयात येण्याची विनंतीही मी केली होती. मात्र, माझ्या निवासस्थानासमोरच आंदोलन करून मला व माझ्या कुटुंबाला त्रास देण्यात आला. मोबाईलवरून मला फोन करून अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. 
- मेधा कुलकर्णी, आमदार 

Web Title: BJP MLA Medha Kulkarni agitation Before the house