शाब्बास! शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामावर भाजप खासदार झाले खूश

Shivsena-BJP
Shivsena-BJP

पुणे - ‘उच्च व तंत्र शिक्षण खाते विद्यापीठ स्तरावर आणून गेल्या पाच सहा वर्षापासून प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. यापुढे अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे फाईल दाबून ठेवल्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्यावर हो किंवा नाही असे उत्तर द्यावेच लागेल, अशी तंबी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच जास्त तक्रारी आलेल्या उच्च शिक्षण सहसंचालकांची खातेनिहाय चौकशा लावल्या आहेत असेही सामंत यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात "उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @पुणे' हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, शैक्षणिक संस्था आदी घटकांच्या प्रलबंत अडचणी सोडविण्यावर सामंत यांनी सनावणी घेतील. त्याबाबत सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ४ हजार ४११ तक्रार अर्ज आले आहेत, त्यापैकी ४ हजार ५३ अर्जावर सकारात्मक निर्णय घेताल आहे. ‘उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय @ पुणे’ या उपक्रमात ऑफलाइन आणि ऑनलाइन मिळून ९२० तक्रारी होत्या. त्यापैकी ७५० तक्रारी आज निकाली काढल्या आहेत. ऑनलाईन तक्रारी ५१९ होत्या. त्यामध्ये ११९ पुणे, ६२ नाशिक व नगर जिल्ह्यातील १६० होत्या, इतर तक्रारी इतर विभागांसदर्भात होत्या. तक्रारी निकाली काढण्याचे प्रमाण ८६ टक्‍के इतके असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला.

आजच्या सुनावणीत अनुकंपा तत्वावरील दोन नियुक्‍तीचे आदेश दिले. वैद्यकीय प्रतिपूर्ती, भविष्य निर्वाह निधीचे परतावा, मृत्यू-नि-सेवा उपदान मंजुरीचे आदेश, कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र यासारखे विषय मार्गी लावले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुमच्या मंत्रालयस्तरावर काय अडचणी आहेत, ते सोडविण्याचे आदेश दिले आहेत. सर्व प्रकरणे मंत्रालयस्तरावर निकाली काढणे अपेक्षित होते. यापुढे दिरंगाई चालणार नाही, असे सामंत सांगितले.

पूजा चव्हाणच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं?

भाजपकडून शिवसेनेचे कौतुक
भाजप शिवसेनेत कायम तणाव असताना या उपक्रमाच्या उद्घटान कार्यक्रमात भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे कौतुक केले. बापट म्हणाले, ‘‘मी पुण्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. यापूर्वी अनेक मंत्र्यांनी चांगले उपक्रम राबविले आहेत, शिक्षण क्षेत्रात प्रश्‍न प्रलंबित रहाणे योग्य नाही, पण माझ्या आयुष्यात हा पहिलाच कार्यक्रम विद्यापीठ आणि शिक्षण क्षेत्रात बघत आहे. प्रश्‍न सोडविण्यासाठी ही खुप चांगली पद्धत अवलंबली आहे. तसेच महाराष्ट्र शासनेने फाईलचा कायदा केला आहे. त्यामध्ये प्रत्येक फाईल कधी आली कधी कोणत्या टेबलबर गेली हे कळते. अनेक फाईल्स वर्षानुवर्षे एकाच टेबलवर आराम करत असतात, त्याचा आढावा देऊन गती दिली पाहिजे. असे सांगितले. दरम्यान, बापट यांनी केलेल्या कौतुकाचा दाखला देत उदय समांत यांनी पत्रकार परिषदेत टीकाकारांना उत्तर देताना मी तक्रारी सोडवून पुण्य कमवत आहे असा टोला लगावला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com