भाजप खासदारांचे गुरुवारी उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - अधिवेशनात विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू दिले नाही. विरोधी पक्षांचा निषेध करण्यासाठी भाजपचे सर्व खासदार त्यांच्या मतदारसंघात येत्या गुरुवारी (ता. 12) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. 

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले; पण त्यात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेचे जेमतेम 43 तास कामकाज झाले. तर, राज्यसभेचे 45 तास कामकाज होऊ शकले. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे 248 तास वाया गेले. त्यामुळे देशभरातील भाजपचे खासदार विरोधकांचा निषेध करण्यासाठी आपापल्या मतदारसंघात उपोषण करणार आहेत. 

याबाबत माहिती देताना खासदार अनिल शिरोळे म्हणाले, ""पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराजवळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत उपोषण करण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.'' 

Web Title: BJP MPs fast on Thursday