भाजपमध्ये जाण्यासाठी पायघड्या

भाजपमध्ये जाण्यासाठी पायघड्या
Published on

विरोधकांना भाजपमध्ये
घेण्यासाठी पायघड्या
ॲड. प्रकाश आंबेडकरः राजकीय व्यवस्था पंगू करण्याचे षडयंत्र
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता २५ : सध्या विरोधी पक्षाचे अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असून, महाविकास आघाडी केव्हाच विसर्जित झाली आहे. राजकारणातून विरोधी पक्ष संपवून राजकीय व्यवस्था पंगू करण्याचे षडयंत्र सुरू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस-महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. काँग्रेसचे अनेक उमेदवार उघडपणे भाजपसोबत बसले असताना पक्षाने कारवाई केली नाही, असे ते म्हणाले. शिवसेनेचे सहा खासदार फुटले आहेत. मात्र, दोन महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री दोन वाजता बैठक झाली होती. याबाबत खुलासा होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. कॉक्रोच जनता पार्टीचे काही दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, अभिजित दीपके याने सोशल मीडियावर चळवळ सुरू करताच काही दिवसांतच त्याचे फॉलोअर दोन कोटीवर गेले. परंतु, तो विशिष्ट समाजाचा असल्याचे कळताच दिल्लीतील मोर्चात गर्दी जमली नाही. याचाच अर्थ आजचा युवक स्वत:च्या प्रश्नांना महत्त्व न देता नेता कोण आहे हे बघून मागे जातात, असे दिसते. संघ स्वत:ला चारित्र्य निर्माण करणारे संघटन म्हणवते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आरोपांबाबत सरसंघचालकांनी जाहीरपणे कुठलाही खुलासा मागितला नाही. त्यांची साधी विचारणा करण्याची हिंमत झाली नाही, असेही आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com