esakal | योगदान शून्य, पण श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी; भामा-आसखेडवरून भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस
sakal

बोलून बातमी शोधा

NCP_BJP

गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी एक रूपयाही दिला नाही.

योगदान शून्य, पण श्रेय घेण्यासाठी बॅनरबाजी; भामा-आसखेडवरून भाजप-राष्ट्रवादीत धुसफूस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''श्रेयवादासाठी भामा आसखेड प्रकल्पाचे काम केले नाही. परंतु ज्यांचे योगदान शून्य आहे. तेच श्रेय घेण्यासाठी बॅनर लावत आहे," अशा शब्दात भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आमदार सुनील टिंगरे यांचे नाव न घेता टीका केली. भाजप सरकारच्या काळातच या प्रकल्पाचे 95 टक्के काम मार्गी लागले असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितले. 

गेमर्ससाठी खुशखबरी! २६ जानेवारीला येणार पब्जीचा देशी अवतार FAU-G​

भामा-आसखेड प्रकल्पाच्या श्रेय घेण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वाद रंगला होता. परंतु हा प्रकल्प लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमात या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी सर्वच पक्षांचे योगदान असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, असे असताना मुळीक यांनी आज पुन्हा या विषयाला तोंड फोडून स्थानिक पातळीवरील हा वाद मिटला नसल्याचे दाखवून दिले. 

पुणेकरांनो, फक्त 66 शाळाच सोमवारपासून सुरू होणार!​

मुळीक म्हणाले, "गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी एक रूपयाही दिला नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, ते पुणेकरांना मान्य नाही. गावे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय देखील राजकीय हेतूनेच घेतला आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image