Video: 'औरंगाबादचं नामांतर हा भावनिक मुद्दा, काँग्रेस-शिवसेनेच्या वादात आम्हाला पडायचं नाही'

Chandrakant_Patil
Chandrakant_Patil

वारजे माळवाडी (पुणे) : "औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर हे नामांतर करायचे आहे. हा आमचा राजकीय मुद्दा नाही. निवडणुकीचा नाही, तर भावनिक मुद्दा आहे. काँग्रेसचा विरोध आहे, तर शिवसेनेला नामांतर पाहिजे आहे. त्यामुळे यात आम्हाला पडायचं नाही," असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

कोथरूड- कर्वेनगर येथील कार्यक्रमापूर्वी पाटील पत्रकारांशी बोलत होते. सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी संभाजीनगर अशी मागणी केली आहे. तुम्ही गोधड्या वाळवत आहात असं म्हणता, तर मग आता नामांतर करा. काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल, तर औरंगजेबाचं तरी नाव कशाला पाहिजे? ते ही हटवा, असे पाटील म्हणाले. 

'सामना'तून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले, ''सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. याबाबतीत आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर अशीच भाषा वापरली आहे. मी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे वहिनींना पत्र लिहिणार आहे. ही तुमची भाषा असू शकत नाही. मग अग्रलेखात ही भाषा कशी वापरली?"

नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत बोलताना पाटील म्हणाले, "कोरोनामुळे जास्त प्रवास करता आला नाही, त्यामुळे नवीन वर्षी जास्तीत जास्त प्रवास करणार आहे. त्याचबरोबर संघटन मजबूत करणे, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा निवडणुका ताकदीने लढणे आणि जिंकणे हे संकल्प आहेत. आणि २०२२ साली मुंबईसह इतर महापालिका निवडणुका लढवणे आणि जिंकणे हे लक्ष्य आहे. मुंबईच्या निवडणुकीवर दिल्लीचेही लक्ष राहील. मुंबई ही काहीजणांची जहागिरी राहिलीय, मात्र इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर समस्यांकडे दुर्लक्ष करणं आणि मनी जनरेट करणं, एवढंच काहींच लक्ष्य राहिलं आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com