esakal | 'जयंतराव, आधी फुकटात जे मिळालंय ते पचवा'; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant_Patil

महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही, असा दावा भाजप करीत असले, तरी राज्य सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढील चार वर्ष भाजपला सरकार पडेल, अशी स्वप्नच बघावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भाजपवर केली होती.

'जयंतराव, आधी फुकटात जे मिळालंय ते पचवा'; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'जयंत पाटील यांनी आमची काळजी करू नये. त्यांना जे फुकटात मिळाले आहे, आधी ते पचवावे आणि नंतरच आम्हाला सल्ले द्यावेत,' असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर केला. महाविकास आघाडीचे सरकार हे नवीन काहीच करीत नाही, केवळ जुने जे निर्णय घेतले आहेत, ते रद्द करण्याचे काम करीत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

'भाजपने पुढील चार वर्षे स्वप्नच पाहत राहावे'; जयंत पाटील यांचा भाजपला टोला​

महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही, असा दावा भाजप करीत असले, तरी राज्य सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढील चार वर्ष भाजपला सरकार पडेल, अशी स्वप्नच बघावे लागेल, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी भाजपवर केली होती. 

पुणे पदवीधर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी केलेल्या टिकेबद्दल विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी असा पलटवार केला. याप्रसंगी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे निवडणूक प्रमुख राजेश पांडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. 

'...तर महाविद्यालयांची मान्यता काढू'; रखडलेल्या प्राध्यापक भरतीवरून 'यूजीसी'चा इशारा!​

शिवसेना नेते संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारले असता पाटील म्हणाले, "राऊत यांना सल्ला देण्यासाठी खरंतर दिल्लीत पाठवले पाहिजे. अमेरिकेतही त्यांच्या सल्ल्याची गरज होती.'' विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपकडून अनेकजण इच्छुक होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही नाव चर्चेत होते. पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला पदवीधर सारखे निवडणुकीत आणि पाच जिल्ह्यात फिरवावे हे काय योग्य वाटत नाही. त्यांना आम्ही मोठी जबाबदारी देणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझी चर्चा झाल्यानंतर ग्रामीण भागात चांगले काम करणाऱ्या संग्राम देशमुख यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)