'भाजपने पुढील चार वर्षे स्वप्नच पाहत राहावे'; जयंत पाटील यांचा भाजपला टोला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले, त्या दिवसापासून आमचे सरकार टिकाणार नाही, असे भाकीत भाजप करीत आहे. परंतु आमच्या सरकारला पूर्ण स्थिरता आहे, हे त्यांनाही माहीत आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

पुणे : "महाविकास आघडीचे सरकार दोन महिनेही टिकणार नाही, असे आम्ही जेव्हा शपथ घेतली तेव्हा भाजपचे नेते म्हणत होते. सरकारला वर्ष पूर्ण झाले. आता भाजपाचे नेते महाविकास आघाडीचे सरकार उर्वरित चार वर्षाचा काळ पूर्ण करणार नाही, असे सांगत आहेत. सरकार पडेल, असे स्वप्न पुढील चार वर्षे पाहत राहावे.' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी (ता.१२) भाजपला टोला हाणला. 

पुणे विद्यापीठाकडून दिवाळीची सुट्टी जाहीर; लागोपाठ सुट्ट्यांमुळे कर्मचारी आनंदले!​

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुणे पदवीधर मतदार संघासाठी गुरुवारी सकाळी अरूण लाड यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर लाड यांनी, तर कॉंग्रेसचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.

Bihar Election: सत्ता कुणाचीही असो, बिहारमध्ये 'जंगलराज'च!​

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले, त्या दिवसापासून आमचे सरकार टिकाणार नाही, असे भाकीत भाजप करीत आहे. परंतु आमच्या सरकारला पूर्ण स्थिरता आहे, हे त्यांनाही माहीत आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, " पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणूक महाविकास आघाडी लढवत असून, आज दोन उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. आमचे सरकार पडेल हे स्वप्न विरोधकांनी पाहत राहावे.'' 

यावेळी उमेदवार लाड म्हणाले, "पदवीधरांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ज्यांनी दोन वेळा पदवीधरांचे प्रतिनिधित्व केले, त्यांनी एकही प्रश्‍न सोडविला नाही. ते प्रश्‍न महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोडविण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत शहरातीलच पदवीधर मतदार नोंदणी करत होते. यावेळी आम्ही ग्रामीण भागात जाऊन पदवीधरांचे मतदार यादीत नाव नोंदविले आहे, त्याचा निश्‍चित आम्हाला फायदा होईल."

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP state president Jayant Patil commented on BJP about Pune Graduate Constituency