चंद्रकांतदादांनी दाखवून दिली भाजपची संस्कृती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे शहरातील आमदार, शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांना बसण्यासाठी सोफ्याची व्यवस्था करण्यात आली होती. व्यासपीठाखाली कार्यकर्ते साध्या खुर्च्यांवर बसले होते.

पुणे : आपल्याला काँग्रेसमुक्त भारत नकोय, तर काँग्रेस संस्कृतीमुक्त देश करायचा आहे, अशी घोषणा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच भाजप संस्कृती काय असते, हे सोमवारी (ता. 22 जुलै) पुण्यात दाखवून दिले.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे शहरातील आमदार, शहराध्यक्ष योगेश गोगावले, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांना बसण्यासाठी सोफ्याची व्यवस्था करण्यात आली होती. व्यासपीठाखाली कार्यकर्ते साध्या खुर्च्यांवर बसले होते. चंद्रकांतदादांनी आपण सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आहोत, असे सांगत व्यासपीठावरील सोफा हलवायला लावला आणि तेथे साध्या खुर्च्या मांडण्यात आल्या. नेते आरामदायी सोफ्यावर आणि कार्यकर्ते खुर्चीत, असा प्रकार या मेळाव्यात त्यामुळे टळला.

या वेळी पाटील यांनी बोलताना महाराष्ट्रात विधानसभेच्या ४० जागांवर पक्ष म्हणून आपण निश्चित जिंकणार, अशी स्थिती आहे. जेव्हा आपण १०० जागांवर वाटेल ते झालं तरी यापेक्षा कमी जागा येणार नाहीत, अशी परिस्थिती येईल तेंव्हा आपलं संघटन मजबूत असेल. येणाऱ्या निवडणुकीत युतीच्या २२७ जागा येणार आहेत. त्यानंतर पुढील पाच वर्षांत आपल्याला अस काम करायचं आहे की काहीही झालं तरी आपल्या जागा १०० पेक्षा कमी होता काम नये. यासाठी इथून पुढे काम करायचं आहे. जी संधी मिळेल त्याचे सोन करा. सतत काम करत राहा, असा सल्ला दिला.

या तीन वर्षांमध्ये आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे. माझ्याकडे तीन वर्ष आहेत. चांगलं काम केले तर अजून तीन वर्षे भेटतील, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state president Chandrakant Patil shown BJP culture