मी शिवसेनेचा हिंतचिंतक म्हणूनच... : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशी कोणतीही चर्चा नाही. दिल्ली विधानसबा निवडणुकीत केजरीवाल खोटे बोलत आहेत, ही निवडणूक रस्ते, गटारांपुरती नाही, ती देशासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारने ‘सीएए’ची अंमलबजावणी करावी आणि या क़ायद्याविरोधातील आंदोलने थांबविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा.

पुणे : शिवसेना होती म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस आणि हिंदू टिकले. शिवसेना ही हिंदुत्वापासून लांब नेण्याचा काँग्रेसचा डाव आहे, हे उद्धव ठाकरे यांनी ओळखावे. मी शिवसेनेचा हिंतचिंतक आहे, म्हणूनच त्यांना नेहमीच सल्ला देत असतो, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात आज (बुधवार) एका कार्यक्रमानिमित्त ते आले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर वक्तव्य करत शिवसेनेचा हितचिंतक असल्याचे सांगत पुन्हा एकदा शिवसेनेला कुरवळण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाविषयीही त्यांनी वक्तव्य केले आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार; राज्य सरकारला 4 आठवड्यांचा वेळ

चंद्रकांत पाटील म्हणाले, की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार अशी कोणतीही चर्चा नाही. दिल्ली विधानसबा निवडणुकीत केजरीवाल खोटे बोलत आहेत, ही निवडणूक रस्ते, गटारांपुरती नाही, ती देशासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र सरकारने ‘सीएए’ची अंमलबजावणी करावी आणि या क़ायद्याविरोधातील आंदोलने थांबविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. मराठा समाजाला कायमसवरूपी आरक्षण हवेच, त्यामुळे राजकारण न करता आपली भूमिका मांडावी. या सरकारमधील काही लोक मराठा आरक्षणाला तात्विक विरोध करीत आहेत, तो नसावा. याबाबतची न्यायालयीन लढाईसाठी विरोधकांना एकत्र घ्यावे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला योग्य न्याय दिला. 17 मार्चला न्यायालयात चांगली बाजू मांडावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state president Chandrakant Patil talked about Shivsena and government