भाजपच्या मुलाखतीला आणा एकच समर्थक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी मुलाखतींना येताना इच्छुकांनी एकाच समर्थकाला बरोबर आणायची परवानगी भाजपने दिली आहे. 

पुणे - महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी मुलाखतींना येताना इच्छुकांनी एकाच समर्थकाला बरोबर आणायची परवानगी भाजपने दिली आहे. 

मुलाखतीला येताना रस्त्यावरून शक्तिप्रदर्शन करू नये, असेही इच्छुकांना बजावले आहे. अन्यथा संबंधित इच्छुकाची पक्ष "दखल' घेईल, असेही पक्षाच्या नोटीस फलकावर म्हटले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज देण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षाकडून 1020 इच्छुकांनी अर्ज घेतले. अर्ज घेण्यासाठी गर्दी वाढल्यामुळे सायंकाळी 5 वाजेऐवजी रात्रीपर्यंत मुदत वाढविली. दरम्यान, पहिल्या दिवशी 20 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केले असल्याचे भाजपचे शहर कार्यालय मंत्री उदय जोशी यांनी सांगितले. 

दरम्यान, इच्छुकांच्या मुलाखतींचे ठिकाण व वेळापत्रक निश्‍चित झालेले नाही, असे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले. पालकमंत्री गिरीश बापट व अन्य वरिष्ठांबरोबर चर्चा करून मुलाखतीचे ठिकाण व वेळ ठरवणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार जानेवारीला पुण्यात येणार असून काही वेळ थांबणार आहेत. त्या वेळी पक्षात आणखी काहीजणांचा प्रवेश होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: BJP supporter of the interview