esakal | बूथवर पोलिंग एजंट म्हणून चांगले टगे नेमा; चंद्रकांत पाटील यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

bapat patil

पदवीधर मतदार संघातील पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बापट यांनी चौफेर टोलेबाजी केली.

बूथवर पोलिंग एजंट म्हणून चांगले टगे नेमा; चंद्रकांत पाटील यांचा भाजप पदाधिकाऱ्यांना सल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पदवीधर मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता प्रचाराची सुरुवात झाली आहे. पुण्यात भाजपने संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आय़ोजित केला होता. यामध्ये बोगस मतदानाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. मतदानाचा टक्का वाढवणं आणि बोगस मतदान रोखणं महत्त्वाचं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. 

पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी म्हटलं की, बोगस मतदार रोखण्यासाठी आतापासूनच वेळ प्रसंगी संघर्ष करावा लागणार आहे. तेव्हा प्रत्येक बुथवर चांगले टगे "पोलिंग एजंट' नेमा. बोगस मतदान रोखण्यासाठी सुरूवातीलाच दोघा-चौघांना बाहेर काढल्यास बोगस मतदारांमध्ये भीती बसेल, असा सल्ला पाटील यांनी दिला. 

पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात भाजप नेत्यांनी सहकाऱ्यांवर टोलेबाजीसुद्धा केली. पुण्याची गोडी एवढी आहे की चंद्रकांतदादा कोल्हापूरसोडून आता पुण्यातच राहायला आले आहेत' अशी खासदार गिरीश बापट यांनी केलेली टोलेबाजी.. तर "विरोधी पक्षातील नाराज उमेदवारांना कसे जवळ करायाचे आणि त्यांना फूटाणे खाऊन घालून काम करून घ्यायचे, हे बापट यांना चांगले जमते,,' अशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी केलेली कोटी. भाऊ आणि दादा यांनी टोलेबाजी आणि कोटीमुळे एकाच हशा उसळला.

हे वाचा - 'भाजपने पुढील चार वर्षे स्वप्नच पाहत राहावे'; जयंत पाटील यांचा भाजपला टोला

पदवीधर मतदार संघातील पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बापट यांनी चौफेर टोलेबाजी केली. कोल्हापूरची चप्पल, सोलापूरची चादर, सांगलीचे भडंग, सातारचे कंदी पेढे प्रसिद्ध आहेत, पुण्याचे काय? असा प्रश्न उपस्थित करून बापट म्हणाले "पुणेकर मुळातच तयारीचे आहेत. पार्सल कोल्हापूरवरून आले काय, की सांगलीवरून, ते व्हाया पुणेच दिल्लीला जाते.'' पुण्याची गोडी अधिक असल्याने चंद्रकांतदादा पुण्यात आले. त्यांनी महात्मा सोसायटीत जसा बंगला घेतला, तसा तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्हालाही कोथरूड परिसरात बंगला पाहून देऊ, असे संग्राम देशमुखांकडे पाहत बापट म्हणताच हसा उसळला. 

त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेले चंद्रकांत पाटील यांनी बापट यांच्या कार्यशैलीवर कोटी केली. ते म्हणाले,"" विरोधी पक्षाला कालपर्यंत उमेदवार सापडत नव्हता. त्यांच्यात एकाला उमेदवारी मिळाली तर बाकीचे नाराज होतात. त्याचा फायदा कसा उचलयाचा हे बापटांना चांगला माहित आहे. नाराजांना जवळ घ्यायचे आणि त्यांना फूटाणे खाऊ घालून काम करून घ्यायाचे.' असे सांगताच "आपल्याकडे मात्र असे चालत नाही,' यांची आठवणही पाटील यांनी करून दिली. 

loading image
go to top