कल्याण-अंबरनाथ विधानसभा काबीज करण्यासाठी भाजप प्रवेशाची रणनीती

दिनेश गोगी
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

उल्हासनगर  : माजी उपमहापौर व 2017 मध्ये पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले विनोद ठाकूर यांच्या सोबत व्यावसायिक रवी पाटील, साई पक्षाचे अमर लुंड व शिवसेनेच्या काही माजी शाखा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागच्या कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांचा कमी फरकाने विजय तर शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांचा पराभव झाला होता. तर अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांचा कमी मतांनी विजय भाजपचे राजेश वानखेडे यांचा कमी मतांनी पराभव झाला होता.

उल्हासनगर  : माजी उपमहापौर व 2017 मध्ये पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले विनोद ठाकूर यांच्या सोबत व्यावसायिक रवी पाटील, साई पक्षाचे अमर लुंड व शिवसेनेच्या काही माजी शाखा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागच्या कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांचा कमी फरकाने विजय तर शिवसेनेचे गोपाळ लांडगे यांचा पराभव झाला होता. तर अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांचा कमी मतांनी विजय भाजपचे राजेश वानखेडे यांचा कमी मतांनी पराभव झाला होता. यावेळेस कल्याण-अंबरनाथच्या जागेवर प्रचंड मतांनी विजय संपादन करण्याच्या उद्देशाने भाजपाने ही प्रवेश देण्याची रणनीती आखल्याचे उघडपणे बोलले जात आहे. 

कालरात्री कॅम्प नंबर 5 मधील सभागृहात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण,प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालीनी,भाजपा जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी,महापौर पंचम कलानी यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी 2015 मध्ये साई पक्षाकडून उपमहापौर असलेले व 2017 च्या निवडणुकीत शिवसेने कडून निवडणूक लढवणारे विनोद ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांचे चिरंजीव धिरज ठाकूर यांनी देखील शिवसेना युवासेना अधिकारी पदाला सोडचिठ्ठी देऊन दोनतीन वर्षांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेला आहे. ठाकूर यांच्या सोबत भाजपा नगरसेवक विजय पाटील यांचे भाऊ व नगरसेविका मिनाक्षी पाटील यांचे पती रवी पाटील, साई पक्षाचे नगरसेवक शेरी लुंड यांचे भाऊ व नगरसेविका कंचन लुंड यांचे पती अमर लुंड व शिवसेना शाखाप्रमुख भारत आहुजा यांनी देखील भाजपात प्रवेश केल्याने कल्याण-अंबरनाथ विधानसभेत भाजपाचे पारडे जड दिसू लागले आहे.

यावेळी सभागृह नेते जमनादास पुरस्वानी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बच्चाराम रुपचंदानी, नगरसेवक विजय पाटील, राजेश वानखेडे, किशोर वनवारी, डॉ.प्रकाश नाथानी, मनोज लासी, प्रदिप रामचंदानी, नगरसेविका मीना सोंडे, अर्चना करणकाळे, मिनाक्षी पाटील, शुभंगीनी निकम, पदाधिकारी राजा गेमनानी, किशोर जग्याशी, कमल पंजाबी आदी उपस्थित होते. दरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालीनी यांच्या आगमनाच्या खुशीत करण्यात आलेल्या फटकेबाजीत एक ठिणगी उडाल्याने झुलेलाल प्रवेशद्वाराने पेट घेतल्याची घटना घडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's entry strategies to capture Kalyan-Amarnath assembly