Bhor News : भरिताचं काळं वांग ठरलं सोनवणे कुटुंबीयांसाठी ‘सोनं’; एक एकरात काढले ३० टनांचे उत्पादन

शेतकरी राजेंद्र महादेव सोनवणे यांनी एक एकरामध्ये काळ्या वांग्याचे (भरीत वांगे) ३० टन उत्पादन घेतले व १० लाखांचा नफा मिळवला.
farmer rajendra sonawane

farmer rajendra sonawane

sakal

Updated on

भोर - न्हावी सर्वे नंबर १५ (ता. भोर) येथील शेतकरी राजेंद्र महादेव सोनवणे यांनी एक एकरामध्ये काळ्या वांग्याचे (भरीत वांगे) ३० टन उत्पादन घेतले व १० लाखांचा नफा मिळवला. सोनवणे वांग्याचे हे पीक तीन वर्षांपासून घेत आहेत. यंदा त्यांना विक्रमी नफा असून गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी ३० टन वांग्यांची विक्री केलेली आहे. आतापर्यंत त्यांना १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com