अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर संपन्न

संतोष आटोळे 
शुक्रवार, 20 जुलै 2018

शिर्सुफळ (पुणे) :राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त रुई (ता.बारामती) येथील राजमुद्रा ग्रुप च्या वतीने महारक्तदान शिबीराचे काल (ता. 19) आयोजन करण्यात आले होते. या वेळी विक्रमी 907 बाटल्या रक्त संकलन झाले.

या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक किरण गुजर, जयसिंग देशमुख, राष्ट्रवादी युवकचे राज्य उपाध्यक्ष किशोर मासाळ, काटेवाडीचे सरपंच विद्याधर काटे, बाळासाहेब तावरे, प्रशांत सातव, रमणिक मोता, मच्छिंद्र चौधर, अरविंद भोसले, सत्यवान घाडगे, रामदास चौधर, राजेंद्र साळुंके, रोहितदास चौधर, नवनाथ चौधर, राजेंद्र इंगुले, शिवाजीराव ढवाण, राजेंद्र साळुंखे, पांडुरंग चौधर आदी मान्यवर उपस्थित होते. 

वाढदिवसानिमित्त राजमुद्रा ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण, अनाथ मुलांना व जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूचे वाटप करण्याबरोबरच विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येतो. यामध्ये राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अमर घाडगे, राहुल भापकर, लाला रांधवण, नवनाथ लोखंडे, विकास जगताप, गणेश धुमाळ, प्रदीप ताकवने, सोमनाथ पवार, चंदू लोंढे, अनिकेत घाडगे, अविनाश सूर्यवंशी, प्रमोद खराडे, शहाजी कुंभरकर, प्रशांत शिंदे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Web Title: blood donation camp on the occasion of ajit pawar birthday