esakal | कोरोनाला हरविण्यासाठी काय पण, बारामतीत आजोबांकडून रक्तदान 
sakal

बोलून बातमी शोधा

blood

रक्तदानाचे आवाहन स्वत: मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अनेक उत्स्फूर्त हात रक्तदानासाठी पुढे आले. काहीतरी करण्याच्या उद्देशाने बारामतीत युवकांसह ज्येष्ठ नागरिकही रक्तदानासाठी धावून आले. 

कोरोनाला हरविण्यासाठी काय पण, बारामतीत आजोबांकडून रक्तदान 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : रक्तदानाचे आवाहन स्वत: मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अनेक उत्स्फूर्त हात रक्तदानासाठी पुढे आले. काहीतरी करण्याच्या उद्देशाने बारामतीत युवकांसह ज्येष्ठ नागरिकही रक्तदानासाठी धावून आले. 

सावधान ! पुण्यातील `या` भागात तुमच्या सोबतही असा भयानक प्रकार घडू शकतो

बारामतीमधील गिरीजा ब्लडबँकमध्येही रक्ताचा तुटवडा असल्याचे समजल्यावरुन येथील फेसबुक ग्रुपमधील तरुणांनी एकत्र येत दोन दिवसांचे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.विशेष म्हणजे इसामिया कासिम आतार या 63 वर्षीय योद्ध्याने  रक्तदानाचा हट्ट धरला व तो पूर्णही केला. वयाचा मुद्दा पुढे करत त्यांना रक्तदानास प्रारंभी नकार दिला गेला, मात्र रक्तदान करायचेच, अस ठरवून गेलेल्या इसामिया यांनी शेवटी रक्तदान केलेच. इसामिया यांच्याप्रमाणेच महिला व मुलींनीही रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

प्रवाशांच्या गर्दीने रेल्वे स्थानक पुन्हा गजबजले

या शिबिरामध्ये 103 बाटल्या रक्तसंकलन केले गेले. रक्तदान शिबिराचे आयोजन योद्धा प्रोडक्शन पब्लिसिटी,  बारामती उद्योगसमूह यांच्या वतीने केले गेले. भूषण सुर्वे, प्रताप कर्णे, योगेश नालंदे, अक्षय येवले, नानासाहेब साळवे, भारत दळवी यांनी परिश्रम घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी शिबिरास भेट देत उपक्रमाची प्रशंसा केली. शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री शंभू चॅरिटेबल ट्रस्टचे सहकार्य लाभले.