पिंपरीतला कचरा उचलतेय मुंबई महापालिका

pcmc.jpg
pcmc.jpg

पिंपरी(पुणे) : पिंपरी चिंचवड शहरात झालेली कचराकोंडी फोडण्यासाठी ठेकेदाराने आता थेट मुंबईहून कचरा वाहतूक करणारी वाहने आणली आहे. गल्लोगल्ली दिसू लागलेली मुंबईतील कचरा वाहतूक करणारी वाहने हाच विषय शहरात सध्या चर्चेचा झाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कचरा संकलन करणे व त्याची वाहतूक करण्याचे काम मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फा आणि बीव्हीजी कंपनीला दिले आहे. बीव्हीजी कंपनीला पिंपरी चिंचवड शहरातील कचरा उचलण्याच्या कामाचा अनुभव आहे. मात्र मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फा या कंपनीला या शहरातील कचरा उचलण्याचा अनुभव नाही. मात्र या कंपनीचे मुंबई महापालिकेत काम सुरू आहे.

मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फा या कंपनीने पिंपरी चिंचवड शहरातील कचरा उचलण्याच्या कामाचा मायक्रो प्लॅन महापालिकेला सादर केला होता. हा प्लॅन फेल गेल्यामुळे शहरात अभूतपूर्व कचराकोंडी झाली. ठेकेदाराची काही वाहने आरटीओकडून पासिंग झालेली नसल्याने ती वापराविना पडून आहेत. शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने संबंधित ठेकेदारास महापालिकेची पन्नास वाहने वापरण्यासाठी दिली आहेत. तरी देखील शहरातील कचरा कोंडी फोडण्यात ठेकेदाराला अपयश आले आहे.

शहरातील कचराकोंडी फोडण्यासाठी मे. ए. जी. एन्व्हायरो इन्फा या ठेकेदाराने आपली मुंबईतील कचरा वाहतूक करणारी वाहने पिंपरी चिंचवड शहरात आणली आहेत. रात्री हेडगेवार भवन येथे ही वाहने उभी केली जातात. शहरातील रस्त्यांवर दिसणारी मुंबई महापालिकेची वाहने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com