Video : श्रीकृष्ण मालिकेतला 'भीम' आहे पुणेकर; मराठमोळ्या महेंद्र घुलेंशी खास बातचीत

सागर आव्हाड 
सोमवार, 25 मे 2020

कोरोनाच्या काळात दुरदर्शनवरील महाभारत, रामायण, श्रीकृष्ण अशा मालिकांनी प्रेक्षकांची पुन्हा एकदा मने जिंकली. या मालिकांमध्ये अनेक दिग्गजांनी आपल्या भूमिका अजरामर केल्या आहेत.

पुणे : कोरोना व्हायरसने देशासह राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळ्यांना घरीच रहावं लागत आहे. अशावेळी नागरिकांची करमणूक व्हाही यासाठी दूरदर्शन नॅशनल आणि रिजनल चॅनेलवर नागरिकांना पुन्हा नव्वदीच्या काळातील विविध मालिका दाखविण्यास सुरवात करण्यात आली. याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

पुणेकरांनो, घरातच बसा...सूर्य ओकतोय आग  

याकाळात मालिकांमध्ये कामे करुन अनेक कलाकार नावारुपाला आले, अनेकांचे करिअर घडले. पौराणिक मालिकांपैकी श्रीकृष्ण मालिकेत मराठी माणसानेही आपला ठसा उमटवला आहे. पुण्यात राहणारे महेंद्र घुले यांनी श्रीकृष्ण मालिकेत भीमाची भूमिका केली होती. 

सध्या सुरु असलेल्या मालिकांचा पार्श्वभूमीवर 'सकाळ'चे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी त्यांच्याशी बातचीत केली. यावेळी त्यांनी नव्वदीच्या दशकातील आठवणींना उजाळा दिला. 

- विद्यार्थ्यांनो, रोजगार निर्मितीसाठी पुणे विद्यापीठाचा घेतला 'हा' निर्णय

कोरोनाच्या काळात दुरदर्शनवरील महाभारत, रामायण, श्रीकृष्ण अशा मालिकांनी प्रेक्षकांची पुन्हा एकदा मने जिंकली. या मालिकांमध्ये अनेक दिग्गजांनी आपल्या भूमिका अजरामर केल्या आहेत. या मालिकांमुळे काही कलाकार नव्याने प्रकाशझोतात येत आहेत. श्रीकृष्ण मालिकेच्या निमित्ताने मराठी असणारे महेंद्र घुले हेही नव्याने लोकांना परिचित होत आहेत. त्यांनी श्रीकृष्ण मालिकेत भीमाची भूमिका साकारली होती. शिवाय त्यांनी हनुमानाचीही भूमिका केली आहे. सध्या ते पुण्यात राहत असून डेक्कन येथे त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे.

- पुण्यावरून 'या' आठ शहरांसाठी सुरु झाली विमानसेवा; लोहगाववरून टेक ऑफ

नव्वदीच्या दशकात पौराणिक मालिकांमध्ये काम करण्याचे अनेक अनुभव त्यांनी यावेळी आमच्यासोबत शेअर केले. पौराणिक मालिकेत काम करणं प्रतिष्ठेचं मानलं जायचं. शिवाय अशा मालिकांमध्ये काम केल्याने लोकांकडून मानसन्मान मिळायचा. अनेक लोक पुजेसाठी आम्हाला आमंत्रित करायचे. काहीवेळा लोक श्रद्धेने पायाही पडायचे, असा अनुभव घुले यांनी सांगितला. 

सध्या सुरु झालेल्या पौराणिक मालिकांमुळे लोकांना नव्याने धर्माची जाणीव होत आहे. लोक घरी राहून धर्माची शिकवण शिकत आहेत. माणसाने कशाप्रकारचे आचरण करावे याचे धडे त्यांना घरबसल्या मिळत आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

- Big Breaking : आता कॉलेजही भरणार शिफ्टमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य!

महेंद्र घुले यांनी श्रीकृष्ण मालिकेत भीमाच्या भूमिकेशिवाय हनुमानाचीही भूमिका साकारली आहे. पण अनेकांना याची माहिती नाही. सर्वात कठीण भूमिका हनुमानाची होती असं घुले सांगतात. नव्वदच्या दशकात हनुमानाची भूमिका करताना तोंडाला सिंथेटिक मास्क लावला जात असे. एकदा मास्क लावला की तो पुढे 12 तास काढण्याची मुभा नसायची. तसेच जेवणही करता यायचं नाही.

फक्त ज्युस घेऊन दिवस काढावा लागत असे, असा अनुभव त्यांनी शेअर केला. त्यावेळच्या कामाची पद्धत आणि आताची पद्धत यात खूप फरक पडला असल्याचंही ते सांगतात. त्यावेळी एअर कंडिशनर नसायचे, बाहेर जाऊन शुटिंग करताना अनेक अडचणी यायच्या. मात्र, आता खूप काही बदललं आहे. अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, असं घुले सांगतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special interview with Mahendra Ghule who played the role of Bhima in Jay Shri Krishna series