रेल्वे ट्रॅकवर आढळला डेंगी रुग्णाचा मृतदेह

रेल्वे ट्रॅकवर आढळला डेंगी रुग्णाचा मृतदेह

उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सिद्धी विनायक हॉस्पिटल येथे मागील चार दिवसापासून डेंगीच्या रोगावर उपचार घेत असलेल्या 30 वर्षीय रुग्णाचा मृत्यूदेह रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ हद्दीतील रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्याने उरुळी कांचन परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

संतोष दामू डुबे (वय-30, रा. डूबेवाडी.(राहू) ता. दौंड) हे त्या रुग्णाचे नाव आहे. संतोषचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी संतोषच्या नातेवाईकांनी केली आहे. 
लोणी काळभोर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संतोष व त्याची आई अंजूबाई हे दोघेजण डेंगीच्या रोगासाठी सिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये मागील चार दिवसापासून उपचार घेत होते. संतोषला रुग्णालयात चौथ्या मजल्यावर तर आईला पहिल्या मजल्यावर उपचार चालू होते.

रविवारी पाहटे अडीज वाजण्याच्या सुमारास संतोषने रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याकडे रुग्णालयाच्या बाहेर जाऊन मोकळ्या हवेत फिरण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र कर्मचाऱ्याने नकार दिल्याने संतोष झोपी गेला. दरम्यान रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक नातेवाईक संतोषला चहा घेऊन आले असता संतोष आईला पाहण्यासाठी जातो असे सांगून खाली आला. मात्र त्यानंतर सुमारे दीड तासांनी त्याचा मृत्यूदेह कोरेगाव मुळच्या प्रयागधाम रोडवरील रेल्वे ट्रॅकवर आढळून आला. पोलिसांनी त्याच्या मृत्यूची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवलेकरीत आहेत.

दरम्यान संतोषचा मृत्यूदेह सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलिस चौकीत आणल्यानंतर संतोषच्या नातेवाईक व कथित शिक्षक पत्रकार मृतदेह चौकीतून हलवावा या मागणीसाठी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संतोषच्या मृत्युच्या कारणांची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. यानंतर मृत्युदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवावे. अशी मागणी संतोषचे नातेवाईक पोलिसांकडे करत होते. तर दुसरीकडे हा कथीत शिक्षक पत्रकार संतोषच्या मृतदेहासह रुग्णवाहिका पोलिस चौकीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे पोलिस चौकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावर लोणी काळभोर पोलिसांनी मध्यस्ती करत संबंधित शिक्षक पत्रकाराला चौकीच्या बाहेर हाकलून दिले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. 

याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक पोलिस इंगवले म्हणाले, संतोष डुबे याच्या मृत्यूची नोंद आस्कास्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सिद्धी विनायक हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असली तरी संतोष नेमका बाहेर कसा पडला. अन्यथा त्याला कोणी नेले. या तपासासाठी हॉस्पिटलच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात येत आहेत. तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी यांची साक्ष घेण्याचे काम चालू आहे. सोमवारी अथवा मंगळवारी संतोषच्या नातेवाईकांचेही जबाब घेण्यात येणार आहेत. पुढील दोन दिवसांत चौकशीनंतर संतोषच्या मृत्यूचे नेमके कारण पुढे येईल असे इंगवले यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com