पिंपरी शहरात रुजतेय अवयवदानाची चळवळ

सुधीर साबळे
बुधवार, 16 मे 2018

पिंपरी - अवयवदानाचे महत्त्व वाढत असून, तरुण वर्गात याबाबत चांगली जागरूकता झाल्याचे समोर आले आहे. गेल्या सात वर्षांत शहरात झालेल्या अवयवदानाचा आकडा ५५०च्या पुढे गेला आहे. वाढत्या सहभागामुळे येत्या काळात ही चळवळ वाढीला लागणार आहे. 

शहरात आतापर्यंत झालेल्या अवयवदानामध्ये तीनशेहून अधिक नेत्रदान झाले आहे. येथीलच दृष्टिहीनांना हे डोळे बसवण्यात आले आहेत. मात्र, मरणोत्तर नेत्रदान अपेक्षेनुसार होत नसल्याचे काही डॉक्‍टरांचे मत आहे. 

हिंजवडी आयटी पार्कमुळे शहरात युवकांचे प्रमाण मोठे आहे. पूर्वी तितकीशी जागृती नव्हती. आता मात्र २० ते ४५ वयोगटातील युवकांना महत्त्व समजले आहे.  

ग्रामीण भागातही अवयवदानाचे महत्त्व पटू लागले आहे. त्यामुळे ही चळवळ गावागावामध्ये पोचली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना याचे महत्त्व सांगितले जाते. अवयवदानासाठी आवश्‍यक असणारी प्रक्रिया केंद्र सरकारने केलेल्या अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार राबवण्यात येते. त्यासाठी ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को ऑर्डिनेशन कमिटी’ची स्थापना केली आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये त्यासाठी स्वतंत्र समिती आहे. 

शहरात दान केलेले हृदय अन्य शहरांतील रुग्णाला बसविले गेले. आदित्य बिर्ला हॉस्पिटल अवयवदानाचे एकमेव केंद्र आहे.

अवयवदानाची चळवळ वाढत आहे. युवकांसह अन्य नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे. सामाजिक संस्थांनीही चळवळीचा प्रचार करावा. 
- रेखा दुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आदित्य बिर्ला हॉस्पिटल

Web Title: body organ donate movement

टॅग्स