शरीरसौष्ठवपटूंमध्ये निराशा; महत्वाच्या स्पर्धांना मुकल्याचा परिणाम

Body Building
Body Building

पिंपरी - जिममध्ये वर्कआउट करता येत नसल्याने आणि बहुतेक महत्वाच्या स्पर्धा रद्द झाल्याने शरीर सौष्ठवपटूंना निराशेने ग्रासले आहे. मात्र, तरीही त्यावर मात करत घरातच 'वेट फ्री' व्यायामावर शरीरसौष्ठवपटू हे भर देत आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात सुमारे १३८ जीम असून या जिमशी जवळपास ३५० शरीर सौष्ठवपटू जोडले गेले आहेत. त्यापैकी, सुमारे १५० खेळाडू हे मोठ्या स्पर्धांसाठी तयारी करत होते. मात्र, बहुतेक सर्व स्पर्धा रद्द झाल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. 

आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू राजेश इरले म्हणाला, "पुणे श्री ची स्पर्धा झाली. मात्र, महाराष्ट्र श्री, भारत श्री यासारख्या इतर महत्वाच्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक जिम बंद असल्याने शरीरसौष्ठव पटूंमध्ये निराशेचे वातावरण आहे. मात्र, त्याने खचून न जाता पुढील वर्षासाठी खेळाडूंनी तयारी केली पाहिजे. सध्या माझा 'वेट फ्री' व्यायामावर भर आहे. 

पिंपरी चिंचवड हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेश सावंत म्हणाले, 'शरीरसौष्ठवपटूंना व्यायाम करणे अशक्य झाले आहे. कुठली जिम चालू आहे याची त्यांच्याकडून विचारणा होत आहे. परंतु, सध्या सर्व जिम बंद आहेत. यंदाचा स्पर्धेचा हंगाम सरल्याने खेळाडूंचे नुकसान झाले आहे. आगामी काळात पिंपरी चिंचवड श्री, महाराष्ट्र श्री, भारत श्री या स्पर्धा होणार होत्या. मात्र, त्या रद्द झाल्या आहेत. अनेक खेळाडू त्या स्पर्धांसाठी तयारी करत होते."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com