पौड येथील वनखात्‍याच्‍या कार्यालयात गावठी बॉम्‍बचा स्‍फोट

paud
paud

माले (पुणे) : पौड (ता.मुळशी) येथील ताम्हिणी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्‍ये अवैध शिकाऱ्यांनी वन्‍यप्राण्‍यांसाठी लावलेले गावठी बॉम्‍ब जप्‍त करुन ठेवण्‍यात आले होते. बुधवार (ता. 5) पहाटे चार ते पाचच्‍या दरम्‍यान याबॉम्‍बचा मोठा स्‍फोट झाला. या स्‍फोटात कार्यालयाच्‍या इमारतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पौड येथील बारमुख यांच्‍या इमारतीत ताम्हिणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे. ताम्हिणी अभयारण्‍य परिसराचे कामकाज येथुन चालते. काही दिवसांपुर्वी मुळशी परिसरातील जंगलांतुन शिका-यांनी रानडुक्‍कर इत्‍यादी प्राण्‍यांच्‍या शिकारीसाठी लावलेले गावठी बॉम्‍ब जप्‍त करुन कार्यालयात ठेवले होते. बुधवारी पहाटेच्‍या सुमारास जप्‍त करुन ठेवलेल्‍या या गावठी बॉम्‍बचा मोठा स्‍फोट झाला. या स्‍फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कार्यालयाचे दरवाजे, खिडक्‍या तुटून पडले. खांबाला तडे गेले, बाजुची भिंत पडली, टेबल, कपाटे इत्‍यादी कार्यालयीन सामान इतस्‍तत फेकले गेले. नागरी वस्‍तीत असुनही हा स्‍फोट झाला त्‍या पहाटेच्‍या वेळी कार्यालयात किंवा आसपास कोणी नसल्‍याने सुदैवाने कोणतीही जिवीत हानी, अथवा जखमी झाले नाही.

स्‍फोटाची माहिती मिळताच ताम्हिणी वन परिक्षेत्राच्‍या अधिकारी अंकिता तरडे, पौड पोलिस स्‍थानकाचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलिस हवालदार अपकाळ यांनी घटनास्‍थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com