‘फुड लायसन्स’चे बंधन

‘फुड लायसन्स’चे बंधन

पुणे- तुम्ही ‘ऑनलाइन फुड’ नियमित मागवता का? तुम्ही पार्सल घेऊन येणाऱ्याकडे कधी परवाना मागितलाय का? हे प्रश्‍न विचारण्याचं कारण, पार्सल देणाऱ्यांपैकी एकाकडेही अन्न परवाना नाही. अशा स्थितीत दररोज ३५ हजार पुणेकर ऑनलाइन फुड मागवतात. त्यामुळे आता पार्सल घेऊन येणाऱ्याकडे ‘फुड लायसन्स’ अवश्‍य विचारा. कारण, या माध्यमातून घरपोच अन्न पोचविणाऱ्या ४५० जणांना अन्न व औषध प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे.  

आपण सगळे पुणेकर खरंतर हॉटेलच्या वेटिंगला कंटाळलोय. शनिवार, रविवार तर हमखास तासभर हॉटेलच्या दारात ताटकळावे लागतं. याला आपल्या पुण्यातील मिसळची हॉटेलदेखील आता अपवाद राहिलेली नाहीत. झटपट घरबसल्या हवं ते खायला मिळावं म्हणून आपण बहुतांश लोक मोबाईल ॲपवरून आपण ऑनलाइन फुड मागवू लागलो. या सेवा देणारे स्विगी, झोमॅटो,  फुंडपांडा, उबेर असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, या कंपन्यांकडून आपल्या आर्डरप्रमाणे पार्सल हॉटेलमधून घरापर्यंत पोचविणाऱ्यांकडे (पिकअप अँड डिलिव्हरी - पीडी) मात्र अन्न परवाना नाही. त्यामुळे ‘एफडीए’ने आता यापैकी ४५० जणांना नोटीस बजावली आहे, असे एफडीएच्या पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.

दिवसाला ३५ हजार ऑर्डर्स 
शहरात सात हजार जण ऑर्डर्स देण्याचे काम करतात. त्यामुळे पुण्यात एका दिवसाला किमान ३५ हजार जण ऑनलाइन फुड घेतात. सध्या फक्त या वितरकांनी अन्न परवाने घेण्यावर भर दिला आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यात या वितरकांकडील अन्न पदार्थांची गुणवत्तादेखील तपासली जाणार आहे.

कायदा काय सांगतो?
अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचे अन्न उत्पादन, वितरण आणि विक्री करण्यासाठी अन्न परवाना बंधनकारक केला आहे. त्यानुसार फक्त वितरणाच्या संस्थेने अन्न परवाना काढणे पुरेसे नाही; तर वितरण करणाऱ्या प्रत्येकाकडे हा अन्न परवाना असणे आवश्‍यक आहे. याचे शुल्कही कायद्याने वर्षाला फक्त शंभर रुपये, असे निश्‍चित केले आहे.

अन्न पदार्थ स्वीकारण्यापूर्वी प्रत्येक ग्राहकाने पार्सल देणाऱ्या डिलिव्हरी बॉयला हा परवाना आहे का, असा प्रश्‍न विचारणे ही आता काळाची गरज आहे.
- संजय नारागुडे, सहायक आयुक्त, एफडीए, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com