मोबाईलवरून करा आता मेट्रोचे तिकीट बुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maha Metro App

पुणे आणि पिंपरीतील मेट्रो ६ मार्चपासून सुरू झाली आहे. मेट्रोला आता प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी, यासाठी महामेट्रोने ‘पुणे मेट्रो’ हे ॲप तयार केले आहे.

मोबाईलवरून करा आता मेट्रोचे तिकीट बुक

पुणे - मेट्रोतून प्रवास (Metro Journey) करायचा आहे; पण तिकिटासाठी (Ticket) मोठी रांग लावावी लागते. त्यासाठीही महामेट्रोने (Mahametro) उपाय शोधला आहे. बसल्या जागी मोबाईलवरून (Mobile) तिकीट बुक (Ticket Book) करून प्रवाशांना (Passenger) आता मेट्रोतून प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठी प्रवाशांना ‘पुणे मेट्रो’ हे मोबाईल ॲप्लिकेशन (Mobile Application) डाउनलोड करावे लागणार आहे.

पुणे आणि पिंपरीतील मेट्रो ६ मार्चपासून सुरू झाली आहे. मेट्रोला आता प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी, यासाठी महामेट्रोने ‘पुणे मेट्रो’ हे ॲप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. मोबाईलमध्ये ते डाउनलोड केल्यावर प्रवाशाचे तपशील भरावे लागतील. पूर्ण माहितीची नोंदणी झाल्यावर वॉलेट किंवा डेबिट कार्डद्वारे प्रवासी प्रवासाचे तिकीट बुक करू शकतील. तसेच रिटर्न तिकीट हवे असल्यासही तेही मिळणार आहे. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक केल्यावर प्रवाशांना क्यूआर कोड ऑनलाइन मिळेल. मेट्रो स्थानकात प्रवेश करताना तो क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रवाशांना मेट्रोमध्ये बसता येईल.

हेही वाचा: पुणे महापालिका हद्दीत ग्रामीण भागातील २१२ अंगणवाड्या वर्ग

मेट्रोचे वेळापत्रक, भाडे दरही उपलब्ध

ॲपवरून प्रवाशांना पीएमपीचे वेळापत्रक पाहता येईल तसेच भाडेतत्त्वावर सायकलही घेता येईल. ई-सायकल, ई-बाइक, कॅबही प्रवाशांना बुक करता येईल. रेल्वे, विमानतळ, पीएमपी आदींची माहितीही प्रवाशांना मिळू शकेल, अशी माहिती महामेट्रोतर्फे देण्यात आली. मेट्रोचे वेळापत्रक आणि भाडे दरही या ॲपवर उपलब्ध आहे.

मेट्रो किमान २० मिनिटांनी

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महामेट्रोने गुरुवारी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यात गर्दीच्या वेळेनुसार मेट्रो प्रवाशांना उपलब्ध होतील, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार दर २० ते ३० मिनिटांनी प्रवाशांना मेट्रोतून प्रवास करता येईल.

Web Title: Book A Metro Ticket From Your Mobile Now

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top