esakal | गोकुळदास शहा यांनी जागविलेल्या इंदापूरच्या आठवणींचे पुस्तक  
sakal

बोलून बातमी शोधा

GOKULDAS SHAHA

गोकुळदास शहा यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त "भाई आणि आम्ही' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. इनामदार, शल्यचिकित्सक डॉ. विद्युत शहा, डॉ. संजय शहा यांच्या हस्ते झाले.

गोकुळदास शहा यांनी जागविलेल्या इंदापूरच्या आठवणींचे पुस्तक  

sakal_logo
By
डाॅ. संदेश शहा

इंदापूर (पुणे) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले, कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा ऊर्फ भाई यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी केले. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

गोकुळदास शहा यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त "भाई आणि आम्ही' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. इनामदार, शल्यचिकित्सक डॉ. विद्युत शहा, डॉ. संजय शहा यांच्या हस्ते झाले. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉ. इनामदार म्हणाले, ""साधी राहणी व उच्च विचारसरणी, महात्मा गांधी व स्वातंत्र्यसैनिक कै. नारायणदास रामदास शहा यांचे संस्कार यामुळे एखाद्या तपस्वीप्रमाणे भाई आपले जीवन व्यतीत करीत आहेत. त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन सर्वांनी वाटचाल करणे गरजेचे आहे. वय 85 वर्षे असताना देखील त्यांची आरोग्य दिनचर्या सर्वांना मार्गदर्शक आहे. त्यामुळे ते आपल्या आयुष्याचे 100 वर्ष नक्की पूर्ण करतील.'' 

पुणेकरांच्या आठवड्याची सुरवात ट्रॅफिक जॅमने

डॉ. विद्युत शहा म्हणाले, ""भाईंचे व्यक्तिमत्व महासागरासारखे असून सर्वांनी सचोटीने काम करावे, हा त्यांचा आग्रह असतो.'' मुकुंद शहा म्हणाले, ""भाईंचा जन्म 10 ऑगस्ट 1936 साली झाला. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर झाले. तालुक्यातील अनेक महत्वपूर्ण बाबींचे ते साक्षीदार आहेत. लॉकडाउन काळात त्यांच्याबरोबर गप्पा मारत असताना समजलेल्या त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक आहे. भाईंचे जीवन म्हणजे महाकाव्य आहे. हे पुस्तक ध्येयवादाने काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.'' 

यानिमित्त माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील , इंदापूर रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर व संजय दोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाई यांचे अभिष्टचिंतन केले. या वेळी डॉ. संजय शहा, शकुंतला शहा, मालती शहा, वैशाली शहा, राणी शहा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा तर सूत्रसंचालन अंगद शहा यांनी केले. आभार नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी मानले.  
 

loading image
go to top