esakal | सासवड : हारतुऱ्यांऐवजी लग्नसमारंभात वाटली पुस्तके
sakal

बोलून बातमी शोधा

सासवड : हारतुऱ्यांऐवजी लग्नसमारंभात वाटली पुस्तके

-विवाह सोहळ्यात हारतुऱ्यांऐवजी सन्मानात पुस्तके वाटली. 
-शिक्षक नेते प्रदिप कुंजीर यांचा स्तुत्य उपक्रम. 

सासवड : हारतुऱ्यांऐवजी लग्नसमारंभात वाटली पुस्तके

sakal_logo
By
श्रीकृष्ण नेवसे

सासवड ः शिक्षक नेते प्रदीप कुंजीर यांचे चिरंजीव मकरंद व भोर तालुक्यातील देगावचे माजी सरपंच प्रकाश सावंत यांची कन्या ऐश्वर्या यांचा विवाह नुकताच पार पडला. त्यात कुंजीर कुटुंबियांनी विवाहात हजेरी लावणाऱ्या मान्यवरांना शाल, हारतुरे न देता.. सन्मानात चक्क वाचनीय पुस्तके वाटली. 

'राजा उदार नाही तर उधार झाला...' : देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

सकाळ माध्यम समुहाच्या `सकाळ प्रकाशन` विभागतर्फे `ग्रंथोत्सव` हा पुस्तक प्रदर्शन व विक्री उपक्रम नुकताच सासवड (ता. पुरंदर) येथे झाला. त्यातून प्रेरणा घेऊन व खास सकाळ प्रकाशनला आर्डर करुन प्रदीप कुंजीर यांनी सुमारे 14,675 रुपयांची 90 वाचनीय पुस्तके निवडूण सवलतीच्या दरात विकत घेतली. ही पुस्तके विवाह मंडपात सन्मानात वाटली, त्याची विवाहस्थळी सकारात्मक चर्चा झाली.

हा कुंजीर व सावंत यांचा विवाह नुकताच सातारा महामार्गावर शिवरे (ता. भोर) येथील कार्यालयात संपन्न झाला.  या सोहळ्यास पुरंदरचे आमदार संजय जगताप, भोरचे आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, सुदाम  इंगळे, माणिक झेंडे, माजी सभापती अतुल म्हस्के, साहित्य परिषदेचे रावसाहेब पवार, यशवंत जगताप, विजय वढणे, रविभाऊ जगताप , बाळासाहेब भिंताडे, उद्योजक पांडुरंग सोनवणे, मोहन जगताप, शिक्षण उपसंचालक  शिवाजी पांढरे, भीमराव फडतरे, दत्तात्रेय शेंडकर, गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे,रामदास वालझाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सरळसेवा भरती MPSC मार्फतच करा; जिल्हाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचं निवेदन​

मान्यवरांनीही शाल, श्रीफळ हारतुरे न देता दर्जेदार व वाचनीय पुस्तके देण्याची परंपरा सुरु केल्याबद्दल प्रदिप कुंजीर व कुटुंबियांना मनोगतात धन्यवाद दिले. म. सा. प. चे रावसाहेब पवार यांनी हा उपक्रम सुचविला व कुंजीर यांनी तो कृतीशिलतेने प्रत्यक्षात राबविला. यापूर्वीही घरातील एका डोहाळे जेवणानिमित्त 11 हजारांचा धनादेश या कुटुंबाने पुरग्रस्तांसाठी दिला होता.

पगार 'लॉक' केल्यामुळं सरकारी वकिलांचं बजेट झालं 'डाउन'!​

विवाहच नाही, तर साखरपुडा, वास्तुशांती, विविध भूमिपुजन - उद्घाटन समारंभ, वाढदिवस आदी कितीतरी कार्यक्रमात शाल, हारतुरे यावर खर्च टाळला पाहिजे. आता बुके देण्याएेवजी बुक द्या. हा उपक्रम साऱयांनी मिळून वाढवूया. सकाळ प्रकाशन सवलतीच्या दरात पुस्तके देईल.-रावसाहेब पवार, महाराष्ट्र साहित्य परीषद

(संपादन : सागर डी. शेलार)