पुणे : ‘‘बोपोडीतील सीटीएस नं. ३ व ४, प्लॉट नं. १४ (सर्व्हे नं. ६२) ही आठ एकर जागा मी विद्ध्वंस यांच्याकडून विकत घेतली आहे. त्या जागेवर बस टर्मिनसचे आरक्षण असून, अमेडिया कंपनीला मी ही जागा विकलेलीच नाही..तरीही या प्रकरणात माझी चौकशी न करता गुन्हा दाखल केला आहे,’’ असा दावा बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे या प्रकरणात पोलिस आणि महसूल विभागाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहे..Pune Land Scam: सरकारी जमिनीवर माफियांचा डोळा! पुण्यात कृषी विभागाच्या जमिनीचा मोठा अपहार; अधिकारीही अडचणीत.बोपोडीतील ही जमीन पेशवे काळापासून विद्धंस यांच्याकडे होती. यासंदर्भात मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध आहेत. १९३० पासून या जागेचा सातबारा विद्ध्वंस यांच्या नावावर आहे. कृषी महाविद्यालय या जागेवर भाडेकरू आहे, जागामालक नाही. २००९ मध्ये आठ एकर जागा मी विद्ध्वंस यांच्याकडून विकत घेतली आहे..या जागेवर बस टर्मिनसचे आरक्षण आहे. त्यामुळे ती ताब्यात द्यावी, असे मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यासाठी २० कोटी रुपयांचा मोबदला दिला जाणार होता. रोख रकमेऐवजी टीडीआर घेण्यासाठी अर्ज केला होता; पण तो अर्ज आम्ही मागे घेतला आहे, असे गावंडे यांनी सांगितले. ही जागा आजही माझीच आहे. ती अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांना कोणालाही विकलेली नाही. पोलिसांनी चौकशी न करता थेट माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असे गावंडे यांनी सांगितले..गावंडे यांचे दावेबोपोडीतील जागा माझ्या मालकीचीकृषी महाविद्यालय हे भाडेकरू आहेतअमेडिया कंपनीचा आणि माझा संबंध नाही, मी त्यांच्याशी व्यवहार केलेला नाहीगुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणारपोलिसांनी चौकशी न करता गुन्हा दाखल केला.महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले...या आरक्षित जागेचा मोबदला म्हणून टीडीआर मागण्यात आला होताही जागा कृषी महाविद्यालयाची असल्याचे समोर आलेत्यामुळे महापालिकेने मोबदल्याचा प्रस्ताव २०१५-१६ मध्येच फेटाळला.जिल्हाधिकारीजितेंद्र डुडी म्हणाले...या प्रकरणावर प्रतिक्रिया देणार नाहीकायदेशीर कारवाई आपोआप होईल.Bopodi Land Scam: गैरव्यवहारातील आरोपी मोकाटच; पोलिस कारवाईबाबत साशंकता, नऊपैकी एकही जण सापडेनात.पोलिस उपायुक्त विवेक मासाळ म्हणालेप्रथमदर्शनी तथ्य दिसल्याने महसूल विभागाने तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झालाया गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणारमहसूल विभागाकडून कागदपत्रे मागवली असून, त्यानुसार पुढील कारवाई.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.