गुळुंच्यातील दोघांना धमकीप्रकरणी अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

सोमेश्वरनगर : गुळुंचे (ता. पुरंदर) येथे एका शिक्षकास "तुझ्या पत्रकार पत्नीस माझ्या बाजूने लिहायला सांग' अशी धमकी दिल्याप्रकरणी आणि गाडी आडवी मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता अभय शिवाजी निगडे आणि विजय सदाशिव निगडे अशी त्यांची नावे आहेत. याबाबत प्रवीण अशोक जोशी यांनी नीरा पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास प्रवीण जोशी हे मुलगा शौर्य व मित्र छगन नलावडे यांच्यासह दुचाकीवरून नीरा येथे जात असताना गुळुंचे फाटा येथे अभय व विजय निगडे पाठीमागून दुचाकीवरून वेगात आले. त्यांनी जोशी यांना गाडी आडवी मारली. यामुळे जोशी यांची गाडी घसरली. जोशी गाडी उचलून पुढे निघाले असता "गावात माझी सत्ता आहे.

पेपरला देताना माझ्या बाजूने द्यायला सांग नाहीतर तुला व तुझ्या पत्नीला जीवे मारीन' अशी धमकी दिली व शिवीगाळ केली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस हवालदार सुदर्शन होळकर यांनी दिली. 

Web Title: Both of the hives were arrested in the threat