Pune News : एअर कॉम्प्रेसरने पोटात हवा भरल्याने मुलाचा जागीच मृत्यू

ही घटना हडपसर औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत सोमवारी घडली.
pune
punesakal

पुणे : चेष्टा मस्करीतून एका तरुणाने एअर कॉम्प्रेसरच्या पाईपने पोटात हवा भरल्याने अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना हडपसर औद्योगिक वसाहतीतील फूड प्रोसेसिंग कंपनीत सोमवारी घडली.

मोतीलाल साहू (वय १६) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी आरोपी धीरजसिंग गोपालसिंग गौड (वय २१) याला अटक केली आहे.याबाबत मोतीलालचा मामा शंकरदिन रामदिन साहू (वय ३४, रा. मूळ बडागाव, ता.‌ बरही, जि. कटनी, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

pune
Pune School Bus Accident : शाळेवरही पोलिसांनी कारवाई करावी; पालकांची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकरदिन आणि आरोपी धीरजसिंग हडपसर औद्योगिक वसाहतीतील पूना फ्लोअर अँड फूड्स कंपनीत काम करतात. ते या कंपनीच्या आवारात राहत होते. दोन महिन्यांपूर्वी मोतीलाल कामासाठी मामा शंकरदिनकडे आला होता. मोतीलाल आणि धीरजसिंग यांची मैत्री झाली होती.

कंपनीतील तिसऱ्या मजल्यावर सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास धीरजसिंग काम करीत होता. त्यावेळी चेष्टा मस्करीतून धीरजसिंगने यंत्रांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या एअर कॉम्प्रेसरने मोतीलालच्या गुदद्वारात हवा भरली. हवा पोटात शिरल्यामुळे शारीरिक इजा होऊन मोतीलालचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे करीत आहेत.

pune
Pune News : आळंदीकडे येणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com