पुणे : रेल्वेपुलावरुन तोल गेल्याने तरुण पडला नदीत 

Shivajinagar_train_bridge-2.jpg
Shivajinagar_train_bridge-2.jpg

पुणे : रेल्वेपुलावरुन पळत जाताना तोल गेल्याने एक तरुण रेल्वे पुलावरुन नदीपपात्रामध्ये पडुन गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री साडे बारा वाजता कामगार पुतळ्याजवळील रेल्वे पुलपरिसरात घडली. शिवाजीनगर पोलिसांनी हद्दीचा वाद न घालता तरुणाचे प्राण वाचविण्यास प्राधान्य दिले.

युवराज विजय सावंत (वय 22, रा. नरपतगिरि चौक) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वेपुलाजवळील मोकळ्या जागेत शनिवारी रात्री साडेबारा वाजता युवराजचे मित्र बसले होते. त्यांच्याकडे पळत जात असताना युवराजचा तोल गेल्याने तो रेल्वे पुलावरुन खाली नदीपात्रामध्ये कोसळला. नदीपात्रातील कठडयावर पडल्याने त्यास गंभीर दुखापत झाली. याबाबतची खबर रात्रगस्तीवर असलेल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालासाहेब कोपनर यांना मिळाली. त्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी जीवरक्षक राजेश काची, अग्निशामक दलास खबर दिली. काची यांनी मध्यरात्री नदीच्या पाण्यात उतरुन युवराजला पाहिले. त्यावेळी तो गंभीर जखमी होता, अग्निशामक दलाने खाली जाळी सोडून युवराजला अलगदपणे उचलून पुलावर आणले. त्यानंतर त्यास उपचारासाठी तत्काळ ससुन रुग्णलयात हलविण्यात आले. सध्या त्याची तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे.


हद्दीपेक्षा जीव महत्वाचा !
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालासाहेब कोपनर हे शनिवारी रात्रगस्तीवर होते. त्यांना ही खबर मिळाली. मात्र ही घटना खडकी पोलिसांच्या हद्दीत घडली होती. परंतु कोपनर यांनी हद्दीचा प्रश्न बाजूला ठेवुन तरुणाचे प्राण वाचविण्यास प्राधान्य दिले. जीवरक्षक राजेश काची यांना बोलावून अग्निशामक दलाच्या मदतीने तरुणाचे प्राण वाचविले. त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी खडकी पोलिसांकडे देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com