शिवनेरीवर माकडाच्या हल्ल्यात मुलगा जखमी

शिवनेरी किल्ला पाहून खाली उतरत असताना महादरवाजा जवळ माकडाने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा जखमी.
Adhatmya gaikwad
Adhatmya gaikwadsakal
Summary

शिवनेरी किल्ला पाहून खाली उतरत असताना महादरवाजा जवळ माकडाने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा जखमी.

जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला पाहून खाली उतरत असताना महादरवाजा जवळ माकडाने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी ता. ०४ रोजी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

पुराणवस्तू खात्याचे कर्मचारी गोकुळ दाभाडे यांनी जखमी मुलास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यास पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत दाभाडे यांनी सांगितले की, मुंबई येथे राहणारा अध्यात्म अशोक गायकवाड वय ६ हा जुन्नर तालुक्यात आई सोबत मामाकडे आला होता. तिघेही शिवनेरी किल्ल्यावर आले होते. ते घरी परतत असताना ही घटना घडली.

महादरवाजा जवळ एक पर्यटक आपल्या लहान कुत्र्याला घेऊन किल्ल्यावर जात होता यावेळी माकड देखील त्यांच्या मागे होते. त्याने अचानक या मुलाच्या हाताचा लचका तोडला. त्याला सात टाके पडले आहे. दरम्यान प्रतिबंधक इंजेक्शन जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्यास उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात असले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com