अभिनेता व्हायचे म्हणून 'त्याने' घर सोडले 

police1.jpg
police1.jpg

पुणे : अभिनेता व्हायची इच्छा असताना, आई-वडीलांनी बळजबरीने इंजिनियरींगला प्रवेश घेण्यास भाग पाडले. त्यामुळे कर्नाटकातील या तरुणाने घरातून निघून थेट रेल्वेने मुंबईच्या दिशेने निघाला. याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट एकला मिळाल्यानंतर त्यांनी त्याला पुणे स्टेशन येथून ताब्यात घेऊन त्याच्या कुटूंबीयांकडे सुपूर्त केले.
 
विशाका चंद्रशेखर शेट्टी (वय 21, रा. कुंदापुर, जि. उडपी, कर्नाटक) असे या तरुणाचे नाव आहे. विशाकाच्या वडिलांचा कर्नाटकात पंच तारांकित हॉटेलचा व्यवसाय आहे. त्याला चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची इच्छा आहे. त्यामध्येच मी करियर करतो असा हट्ट तो आई वडीलांकडे करत होता. परंतू त्याला इंजिनयरींगला प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे त्यामध्ये मन लागत नसल्याने त्याने घरातून निघून मुंबईला पळून जाण्याचे निश्‍चीत केले.

कोईमतूर एक्‍सप्रेसने ​ तो मंगळवारी मुंबईच्या दिशेने निघाला. विशाका हा घरातून पळून गेल्याचे त्याच्या आईवडीलांना कळाले. त्यांनी त्वरीत पोलिसांशी संपर्क साधला. तेथील पोलिसांनी गुन्हे शाखेतील युनीट एकचे वरिष्ठ निरीक्षक अरूण वायकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना विशाकाचा मोबाईल क्रमांक, फोटो, रेल्वेचे तिकीट पाठवून दिले. वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री पुणे स्टेशन येथे कोईमतूर एक्‍सप्रसची झडती घेतील. त्यामध्ये तो जनरलच्या डब्ब्यात आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याला अभिनेता व्हायचे असल्याने घरातून पळून आल्याचे त्याने सांगितले. विशाकाला त्याच्या मामाच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पळून गेला पण मित्राशी संपर्क 
घरातून पळून गेल्यानंतर विशाका हा त्याच्या मित्राच्या संपर्कात होता. त्याला त्याने रेल्वेचे तिकीटही पाठवून दिले होते. त्यामुळे त्याचा शोध घेता येणे शक्‍य झाले. परंतू घरचे त्याला शोधून काढतील असा संशय आल्यानंतर त्याने त्याचा फोन दौंड जवळ आल्यावर फेकून दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com