Pune News : आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर सात गावातील डिंभे धरणग्रस्ताकडून बहिष्कार टाकण्याचा इशारा

डिंभे धरण बांधून ४० वर्षे झाली परंतु धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही अतिशय गंभीर असून फक्त जमीनी ताब्यात दिल्या आहेत परंतु शेतात जाण्यासाठी रस्ता नाही,पाणी नाही त्यामुळे या मुलभूत सोयी सुविधांपासून आजही वंचीत आहे.
boycott lok sabha election of seven village dimbhe dam politics
boycott lok sabha election of seven village dimbhe dam politicsSakal

निरगुडसर : डिंभे धरण बांधून ४० वर्षे झाली परंतु धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही अतिशय गंभीर असून फक्त जमीनी ताब्यात दिल्या आहेत परंतु शेतात जाण्यासाठी रस्ता नाही,पाणी नाही त्यामुळे या मुलभूत सोयी सुविधांपासून आजही वंचीत आहे.

डिंभे धरणामुळे एकूण २४ गाव फक्त विस्थापित झाली नाही तर पेसा कायद्याच्या कवचातून सुद्धा कायमची बाहेर गेली परंतु ज्या सोईसुविधा पुरवणे गरजेचे आहे त्या आजही पुर्ण झाल्या नाहीत,

या सोई सुविधा जर पुढील एक ते दिड महिन्यात सोडवल्या नाही तर आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर डिंभे धरणग्रस्ताकडून बहिष्कार टाकण्याचा इशारा बिरसा ब्रिगेडचे आंबेगाव तालुका अध्यक्ष आनंद मोहरे यांनी बिरसा ब्रिगेडचा सात पुनर्वसन गावांची अन्यायाविरोधात मोट बांधणारा पुनर्वसन गावांचा महामेळाव्यात दिला.

निरगुडसर-कोलतावडे (ता.आंबेगाव)येथे क्रांतीसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा, क्रांतिकारक राघोजी भांगरे, होन्या भागूजी केंगले, नाग्या कातकरी,राया ठाकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर-कोलतावडे, पुनर्वसन गावठाण कळंबई,दिगद वसाहत (खडकी फाटा),

पुनर्वसन गावठाण काठापूर बुद्रुक,फुलवडे वसाहत(गावडे वाडी) व पारनेर तालुक्यातील पुनर्वसन गावठाण जवळा,पुनर्वसन गावठाण,म्हसे खुर्द या सात गावातील आदिवासी बांधव एकत्र आले होते. निरगुडसर गावातून आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेंची भव्य मिरवणूक काढण्यात आली,यावेळी मतेवाडी येथील ढोल पथक, भिवाडे येथील लेझीम पथक हातवीज येथील टिपरी पथक यांनी नेत्रदीपक नृत्य सादर केले.

मिरवणूक नंतर पुनर्वसन गावठाण येथे झालेल्या मेळाव्यात प्रमुख पाहुण्यांचा हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नर्मदा बचाव आंदोलनाच्या योगिनिताई खानविलकर,

बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम,आंबेगाव अध्यक्ष आनंद मोहरे,सरपंच रविंद्र वळसे पाटील दामोदर ढवळे, विभागप्रमुख निलेश किर्वे उपस्थित होते.

जि.प शाळा शिनोली,पं.ज.नेहरू विद्यालय निरगुडसर व जि.प. शाळा पिंपळगाव घोडे येथील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र लोहकरे तर प्रास्ताविक अशोक किरवे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन जालिंदर किरवे ,तुषार किरवे, दिनेश भांगे,भाऊ शेळके,नवनाथ कोरके,चरण वाळकोळी यांनी केले.

बिरसा बिग्रेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण बुधाजी पारधी म्हणाले की,आदिवासी समाजाने कोणताही विचार न करता स्वतःची जमीन धरणाला डिंभे धरणाला दिली, या धरणामुळे फक्त तालुकाच नव्हे तर राज्यातील अनेक भाग सुजलाम सुफलाम झाला.डिंभे धरणाच्या पाण्यामुळे ज्यांच्या घरात चूल पेटते तो प्रत्येक जण आदिवासी समाजाचं देण लागतो.

मात्र पुनर्वसन बांधवांकडं येथील प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधिनी लक्ष न दिल्याने 40 वर्ष उलटून सुद्धा त्यांचे प्रश्न सुटले नाहीत.जर शांततेच्या मार्गाने सुटणार नसतील तर बिरसा ब्रिगेड पुनर्वसन गावच्या सर्व बांधवांना घेऊन कॅनॉल मध्ये बसल्याशिवाय राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com