esakal | इंदापुरात अनाथांचे नाथ पुरस्काराचे व्यक्ती व संस्थांना वितरण
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

इंदापुरात अनाथांचे नाथ पुरस्काराचे व्यक्ती व संस्थांना वितरण

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूरमधील माऊली बालकाश्रमातील मुला-मुलींना पुढील शिक्षणासाठी वाघोली, पुणे येथील मुख्य अनाथाश्रमात पाठविण्यात आले. यानिमित्त येथील युवा क्रांती प्रतिष्ठानच्यावतीने या अनाथ मुलांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या सर्वांना अनाथांचे नाथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा: डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण: आरोपींवर 15 सप्टेंबरला आरोप निश्चिती

यावेळी सागर भिसे, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा, ना.रा. हायस्कुल १९९६ बॅच, पै. पांडूरंग खिलारे गुरूजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन खिलारे, सचिन व्हावळ, रमेश टुले, पियुष बोरा, भारतीय जैनसंघटनेचे शहराध्यक्ष धरमचंद लोढा, प्रशांत मामा उंबरे युवा मंच, जिजाऊ ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.जयश्री गटकुळ, लायनेस क्लब ऑफ इंदापूर, १९९२ ची एसएससी बॅच, शेख लकी परिवार, राजेंद्र जगताप, दुर्गा शिंदे, डॉ. अभिजीत घाडगे, रोहिणी बोरा यांना अनाथांचे नाथ पूरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सिताप म्हणाले की, गेले सात ते आठ वर्ष या अनाथ लेकरांनी आपल्याला खुपजीव लावला. दिवाळीमध्ये त्यांना अभ्यंग स्नान घालून, औक्षण करत फुलबाजे फटाके व दिवाळी फराळ, रंगपंचमीला रंग लावणे, कोजागिरीला मसाला दुध, पाडव्याला साखर घाट्या, ईदला शिरखुरमा मेजवानी होत होती. कधी आळंदी, कधी पंढरपूरला त्यांची सहल नेली होती.

त्यामुळे त्यांना निरोप देतांना हदय भरून आले आहे. युवा क्रांती प्रतिष्ठानचा गोपाळकाला या परमेश्वराच्या लेकरासोबत साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले असून त्यांना पुढील आयुष्यासाठी आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेत. युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दशरथ भोंग, उपाध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

loading image
go to top