Vidhan Sabha 2019 : सुनील कांबळे यांना भरघोस मताने निवडून द्या : ब्रह्मानंद कनगती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

कॅन्टोन्मेंट : ''काही काळापूर्वी गायकवाड यांच्या प्रचारासाठी या भागात आलो होतो. त्यांचा प्रचार केल्यामुळे ते भरघोस मतांनी विजयी झाले. आता सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी आलो आहे. त्यांनाही भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन दक्षिणात्य अभिनेता ब्रह्मानंद कनगती यांनी केले.

Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''काही काळापूर्वी गायकवाड यांच्या प्रचारासाठी या भागात आलो होतो. त्यांचा प्रचार केल्यामुळे ते भरघोस मतांनी विजयी झाले. आता सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी आलो आहे. त्यांनाही भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन दक्षिणात्य अभिनेता ब्रह्मानंद कनगती यांनी केले.

लोकांच्या प्रचंड उत्साही गर्दीमध्ये ब्रह्मानंद कनगती यांचे घोरपडी भागात आगमन झाले. त्यांनी तेलगू भाषेत उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी सादर केलेल्या चित्रपटातील संवादांनाही लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

''घोरपडी उड्डाणपुलाच्या संदर्भात काँग्रेसने केलेले आरोप खोडसाळपणाचे असून त्यांच्याकडे त्याचा कुठलाही पुरावा नाही. या पुलासाठी स्वर्गीय केंद्रीय मंत्री मनोहर पर्रीकर, चंद्रकांतदादा पाटील तसेच स्थायी समितीच्या माध्यमातून मी देखील प्रयत्न केले. स्थायी समितीच्या माध्यमातून 28 कोटी रुपयांची तरतूद या पुलासाठी केली. मात्र काही लोक चुकीचे आरोप करत लोकांची दिशाभूल करीत आहेत. मतदारांनी त्यांच्या प्रलोभनांना बळी पडू नये आणि भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,'' असे आवाहनही कांबळे यांनी केले. यांनी यावेळी उत्तर प्रदेशातील आमदार रवि सतिजा मोदींवरील जोशपूर्ण कविता सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. 
 

यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक विवेक यादव, नगरसेविका किरण मंत्री, दिलीप गिरमकर, गोपाळ चिंतल, मंगला मंत्री, श्रीकांत मंत्री, दिनेश गायकवाड,  संगीता आठवले, नारायण सावा, रवींद्र खैरे, आशिष सुर्वे, के. भास्कर रेड्डी, माधव रेड्डी भीमा रेड्डी, आरपीआयचे महेंद्र कांबळे, सुशांत निगडे आदी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनीही नागरिकांशी संवाद साधला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brahmanandam Kanneganti asked to vote Sunil Kamble for maharashtra Vidhan Sabha 2019