गडकरींचा पुतळा महिनाभरात बसवा अन्यथा...; ब्राह्मण महासंघाचा इशारा (व्हिडिओ)

Pune
Pune

पुणे : मराठी कवी, नाटककार राम गणेश गडकरी यांची आज (बुधवार) पुण्यतिथी आहे, पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर अजूनही त्यांचा पुतळा महापालिकेने आश्वासन देऊन ही इतरत्र बसवला नाही, तीन वर्षांपूर्वी संभाजी उद्यानातून संभाजी ब्रिगेडने गडकरी यांचा पुतळा हटवला आहे, त्यामुळे आज गडकरी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संभाजी उद्यानात ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुतळा हटविलेल्या जागी हार घालून महापालिकेचा निषेध करण्यात आला.

3 वर्षे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून वारंवार पुतळा बसवण्यासंदर्भात महापालिकेकडे पाठपुरावा केला जातोय, मात्र सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी महापालिकेकडून पुतळा अद्याप बसवण्यात आलेला नाही.

संभाजी बागेत गडकरींचा पुतळा बसवण्याला संभाजी ब्रिगेडचा कडाडून विरोध आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी बागेत किंवा इतर कोणत्याही जागेत गडकरींचा पुतळा बसवण्यात यावा. महापालिकेला याची आठवण करुन द्यावी यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पुतळ्याच्या जागी हार घालून निषेध केला.

महापालिकेने पुढील एक महिन्यात गडकरींचा पुतळा बसवला नाही, तर अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने महापौर आणि आयुक्त यांच्या कार्यालयात गडकरींचा पुतळा बसवण्यात येईल. महापालिकेने आम्हाला जागा उपलब्ध करुन द्यावी ब्राम्हण महासंघाच्या वतीने स्वखर्चाने पुतळा बसवण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com