अदितीज रिबेरा : प्रशस्त आणि सुविधांनी परिपूर्ण गृहप्रकल्प 

aditi.
aditi.

बाणेर येथील अदिती रिबेरा २ आणि ३ बेडरूमच्या सर्व सुविधांनी परिपूर्ण प्रकल्प आहे. पुणे विद्यापीठापासून ४ ते ४.५ किलोमीटर अंतरावर औंध, बाणेरला जोडणाऱ्या १०० फुटी रस्त्यालगत असून आजूबाजूला शाळा, हॉस्पिटल्स, मार्केट प्रस्तावित मेट्रो, वॉकिंग डिस्टंन्सवरती आहे. औंधपासून अत्यंत जवळ असल्याने प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला असून मोजक्याच सदनिका शिल्लक आहेत.

या प्रकल्पामध्ये गार्डन, ओपन इयर अँम्पिथिअटर, एन्ट्रन्स गेट, सुरक्षा भिंत इत्यादी कामे सुबकरित्या केली असून, ओल्या कचऱ्याच्या नियोजनासाठी डिकंपोस्ट मशीन त्याचप्रमाणे जनरेटर बॅकअप, प्रत्येक बाथरूमसाठी सोलर वॉटर यांसारख्या आवश्यक सुविधा दिलेल्या आहेत. डेकोरेटिव्ह एन्ट्रन्स लॉबीबरोबर स्ट्रेचर लिफ्ट, प्रत्येक फ्लॅटला व्हिडिओ डोअर फोन, तसेच अंतर्गत सुविधांमध्ये एन्ट्रन्स लॉबी, हॉल व डायनिंगमध्ये इटालियन मार्बल तसेच जगव्वार सारख्या ब्रँडेड कंपनीचे सॅनिटीवेअर व सिपीफिटींग दिलेले आहे. प्रशस्त रूमज् व मोठ्या ॲल्युमिनिअम विंडो दिल्याने फ्लॅटमध्ये हवा व प्रकाश उत्तम आहे. 

प्रकल्पाला महानगरपालिकेचे विपुल प्रमाणात पाणी आहे, त्याचप्रमाणे बोरिंगचे पाणी देखील उपलब्ध असून त्यासाठी वेगळ्या टाकीचे नियोजन केले आहे. बिल्डिंगच्या सभोवताली ट्रीमिक्स क्रॉक्रीट केल्याने परिसर अत्यंत स्वच्छ आहे. गार्डनमध्ये मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया व लॉनची व्यवस्था केलेली आहे. वृद्धांसाठी देखील बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. इमारतीभोवती गार्डन मधून चालण्यासाठी सुंदर पाथवेची व्यवस्था केलेली आहे. प्रकल्पाला पूर्णत्वाचा दाखला मिळाल्याने ग्राहकांना जीएसटी भरण्याची आवश्यकता नाही. एकंदरीत २ बेडरूम व ३ बेडरूम प्रशस्त फ्लॅट  घेणाऱ्यांसाठी अदिती रिअलटर्स तर्फे निर्मित अदितीज रिबेरा हा उत्तम गृह प्रकल्प असून ग्राहकांनी निश्चितपणे भेट देऊन पाहणे आवश्यक आहे असे वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com