Cresco Healthcare
Cresco Healthcare

क्रेस्को हेल्थकेअर : क्रेस्को हेल्थकेअरव्दारे घरबसल्या पॅथॉलॉजी चाचण्या

श्री. पंकज शहा, श्री. परेश शहा आणि परिवार यांनी स्थापन केलेल्या क्रेस्को हेल्थकेअर या संस्थेतर्फे कोणत्याही प्रकारच्या रुग्णांना घरबसल्या पॅथॉलॉजी चाचण्या योग्य दरात आणि त्यांच्या पसंतीच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीत करता येतात. सध्या पुण्यात सुरू असलेली ही सेवा लवकरच संपूर्ण राज्यात व देशभरात सुरू करण्याचा संस्थापकांचा मानस आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘क्रेस्को’च्या सेवेअंतर्गत रुग्ण घरी असो व कामाच्या ठिकाणी; त्याच्या रक्त, लघवी, थुंकी इ. चे नमुने घेतले जातात व ते पुण्यातील सर्वोत्तम अशा आणि रुग्णाच्या पसंतीच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये घेऊन जाऊन त्यांची तपासणी केली जाते. ही तपासणी झाल्यानंतर येणारा रिपोर्ट रुग्णाला त्याच्या ई-मेलवर किंवा ‘क्रेस्को’ने विकसित केलेल्या अ‍ॅपवर पाहता येतो. अ‍ॅपद्वारे रुग्णांना त्यांना करावयाच्या टेस्ट्सची आगाऊ नोंदणीदेखील करता येते.

क्रेस्को हेल्थ केअर सोबत पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय, भारती हॉस्पिटल या नामवंत हॉस्पिटल्समधील पॅथॉलॉजी लॅब्ज तसेच मेट्रोपोलिस आणि आयजेनेटिक डायग्नोस्टिक या खासगी लॅब्ज जोडल्या गेलेल्या आहेत. सध्या सदाशिव पेठ आणि कर्वेनगर या भागात ‘क्रेस्को’ची कलेक्शन सेंटर्स असून येत्या सहा महिन्यात पुण्यातील सर्व महत्त्वाच्या भागातून ही सुविधा सुरू केली जाणार आहे. ‘क्रेस्को’च्या वतीने पुणे व पिंपरी या भागात टेक्निशिअनसोबत होम व्हिजिटची सोय उपलब्ध असून तपासणीसाठी नमुने गोळा करण्यासोबतच औषधेही पुरविली जातात. हे टेक्निशियन इतके निष्णात आहेत की ते नवजात बालकांचीही सॅम्पल्स सहजपणे घेऊ शकतात जे एरवी सहज शक्य नाही.

पॅथॉलॉजी लॅब्जच्या दरातच घरबसल्या तपासणी व त्याचे रिपोर्टस् उपलब्ध होणे ही ‘क्रेस्को’ने सुरू केलेल्या या सेवेची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. शिवाय ‘क्रेस्को’च्या अ‍ॅपवर तुम्हाला तुमचे सर्व वैद्यकीय रेकॉर्डस् विनाशुल्क एकत्रितपणे ठेवता येतात व मोबाईलच्या माध्यमातून ते कायमच तुमच्या जवळ राहतात.

‘क्रेस्को’ आता गर्भवती महिलांसाठी ‘‘क्रेस्को एलिट क्लब ऑफ प्रेग्नन्ट वुमेन’’ तयार करणार असून यात सहभागी होणाऱ्‍या महिलांना १० ग्रॅमपर्यंत सोने जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये, तेथील लोकांना घरातच तपासणीची सोय उपलब्ध करून देण्याचाही ‘क्रेस्को’चा प्रयत्न आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून पंकज आणि परेश शहा यांनी हाती घेतलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क -
८९५-६४६६-८०१ / २ / ३ / ४ / ५
वेबसाईट : www. crescohealthcare.com

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com