देसाई बंधू आंबेवाले : उत्कृष्ट सेवेची परंपरा

desai bandhu
desai bandhu

ग्राहकांना १९३२ पासून सेवा देणारे तसेच दर्जा, गुणवत्ता व समाधान जपणारे एकमेव दुकान म्हणजे पुण्यातील सुप्रसिद्ध ‘देसाई बंधू आंबेवाले’. आमच्या विविध व्यवसायांमधून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.

‘देसाई बंधू आंबेवाले’ यांच्यातर्फे गेली १० वर्षे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात साडेतीन मुहूर्तांपेकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया यादिवशी ११,००० हापूस आंब्यांच्या ‘महानैवेद्य’ बाप्पास दाखवला जातो. दुसऱ्‍या दिवशी त्यातील काही आंबा हा भक्तांमध्ये वाटला जातो तसेच काही आंबा ससून हॉस्पिटलमधील रूग्णांना वाटप केला जातो. याशिवाय दिवाळीत अनाथ मुलांना ‘दिवाळी फराळ’ वाटपाचे कार्यक्रमदेखील राबविला जातो.

सध्या सुरू असलेल्या ‘कोरोना (कोविड-१९)’ या विषाणू वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्राहकांचे आरोग्य जपणे हे आमचे कर्तव्य आहे. आमच्या ग्राहकांची सुरक्षा व योग्य ती सुविधा या गोष्टींना आम्ही प्राधान्य देत आहोत. ‘देसाई बंधू आंबेवाले’ आपल्या पेणच्या शास्त्रशुद्ध व पारंपरिक गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत. यंदा २२ ऑगस्ट रोजी सुरू होणारा गणेशोत्सव सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून अगदी साधेपणाने व सुरक्षितरित्या साजरा करावयाचा आहे. त्यामुळे आम्ही गणेशोत्सव सुरू होण्याच्या १० दिवस अगोदर म्हणजेच दि. १२ ऑगस्टपासूनच ग्राहकांना नोंदणी केलेली गणेशमूर्ती घरी घेऊन जाता येईल अशी व्यवस्था करीत आहोत. त्यानुसार, पेणच्या शास्त्रशुद्ध व पारंपरिक गणेशमूर्तींची नोंदणी सुरू देखील झालेली आहे. त्यामुळे आपली ‘श्रीं’ची मूर्ती आजच नोंदवा.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांच्या कर्वे रोड, शनिपार व बाणेर या ३ दालनात पेणच्या शास्त्रशुद्ध व पारंपरिक गणेशमूर्तींची नोंदणी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com