डी आर शहा आणि सन्स् : खुसखुशीत साहिल चकली

Sahil
Sahil

‘चकली म्हटलं की ती ‘साहिल’चीच!’ हे जणू एक समीकरणच झालेलं आहे इतका हा ‘ब्रँड’ लोकप्रिय झालेला आहे. फक्त दिवाळीत खाण्याचा फराळाचा पदार्थ न राहता, चकली हा कधीही खाण्याचा एक ‘फेव्हरेट स्नॅक’ बनवण्यातचं श्रेय ‘साहिल’ लाच आहे!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बदलत्या ‘वर्किंग कल्चर’मुळे, घरच्या गृहिणीला सगळ्या धावपळीत हे पदार्थ बनवण्यासाठी पुरेसा वेळ देता येणं खूप कठीण झालं आहे ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत घरच्या प्रमाणेच चव आणि दर्जा असलेली ‘साहिल’ उत्पादने ग्राहकांमध्ये झपाट्याने लोकप्रिय झाली यात काहीच नवल नाही!

योगिता मॅडम व प्रदिप शहा सर या दांपत्याने १९९९मध्ये फक्त दिवाळी फराळापुरताच मर्यादित असलेला ‘चकली’हा पदार्थ मोठ्या प्रमाणावर उत्पादन करत ‘ब्रँड’ म्हणून घराघरांत पोचवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून व्यवसायास सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे स्वरूप घरगुतीच होते. योगिता मॅडम दिवसा भाजणीसाठी लागणारी धान्य भाजून ठेवत असत आणि रात्री प्रदिप सर उशिरापर्यंत दळून ठेवत. त्यानंतर योगिता मॅडम चकल्या करत.

रॉकेलवर चालणारा स्टोव्ह आणि काही किरकोळ साहित्य या भांडवलावर ‘साहिल’ची सुरुवात झाली. उत्तम सुगरण असलेल्या आजे-सासूबाई शेवंताबेन गुजर यांच्यापासून योगिता यांनी प्रेरणा घेतली. परंपरागत पाककृती, उत्कृष्ट कच्चा माल आणि सातत्य यामुळे ‘ब्रँड साहिल’ वाढू लागला. प्रदिप सर यांना FMCG क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव ही सुद्धा ‘ब्रँड साहिल’साठी भक्कम जमेची बाजू ठरली आणि ‘ब्रँड साहिल’ची घोडदौड सुरू झाली, ती आजही सुरूच आहे.   

निश्चयपूर्वक आणि चिकाटीने ध्येय गाठण्याच्या वृत्तीमुळेच, रोज ५ किलो चकल्या तयार करण्यापासून आज काही टन चकल्यांचं उत्पादन करण्यापर्यंतची उत्तुंग झेप ‘ब्रँड साहिल’ने घेतली आहे. एका छोट्या खोलीत तयार होणारा हा ‘ब्रँड’ आज स्वतःच्या भव्य कारखान्यात विविध उत्पादनं तयार करत आहे. ‘साहिल’चा कारखाना सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनलेल्या यंत्रसामग्रीने सुसज्ज आहे. साहिलची जगप्रसिद्ध चकलीसह, बटर चकली, लाईट चिवडा, कडबोळी, बाकरवडी तसेच सोया स्टिक्स, कॉर्न स्टिक्स, पोटॅटो स्टिक्स अशी लहान-मोठ्या सर्वानाच आवडणारी उत्पादनं सर्वत्र उपलब्ध आहेत. या यादीत अनेक अनोख्या आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांची भर आगामी काळात पडणार आहे.   

वाढत्या मागणीमुळे उत्पादन क्षमता दिवसेंदिवस वाढत चालली असली तरीही ‘साहिल’ पदार्थांची पारंपरिक चव, ताजेपणा, त्यांचा उत्कृष्ट दर्जा, उत्पादनाच्या ठिकाणी आवश्यक असलेली स्वच्छता, शासकीय सुरक्षेच्या नियमांचं काटेकोर पालन आणि कामगिरीतलं सातत्य याकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष पुरवले जात असल्याने, ‘ब्रँड साहिल’ची चकली व इतर ‘नमकिन’ उत्पादने लोकप्रियतेची शिखरं सर करत आहेत. 

अधिक माहितीसाठी : drshah@sahilchakali.com

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com